तुरंगी (पक्षी)
तुरंगी (साधुबुवा) (इंग्लिश:jerdon's courser, doublebanded courser) हा एक पक्षी आहे. हा पक्षी धाविकासारखा दिसतो. याच्या वरील बाजूचा रंग गुलाबी, रेतीसारखा तपकिरी असतो माथा आणि मानेखालचा रंग गर्द तपकिरी असतो. गाल पांढुरके, हनुवटी आणि कंठ पांढरा असतो. कंठाखालचा भाग आरक्त असतो. तपकिरी छातीची किनार पांढऱ्या पट्टीने वेगळी दिसते. छातीवर पांढरी पट्टी व इतर भाग पांढुरका असतो.
निवासस्थाने
दगडाळ झुडपी जंगले या ठिकाणी हा पक्षी राहतो. जवळ जवळ नामशेष झालेला हा पक्षी पूर्वी आंध्र प्रदेशातील पेन्नार आणि गोदावरीच्या खोऱ्यातील दगडाळप्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता.१९९० नंतर हा पक्षी पुनः दिसून आला नाही.१९७५-७६ साली आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवतम भागात शोध घेत असताना पुनः दिसून आला.