Jump to content

तुघलक घराणे

तुघलक घराणे
سلسلہ تغلق
इ.स. १३२०इ.स. १४१३  
 
 


राजधानीदिल्ली
शासनप्रकारसल्तनत
अधिकृत भाषाफारसी,

तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले. दिल्ली सुलतानशाहीच्या सत्तेवर खिलजी घराणे नंतर तुगलक घराण्याने 1320 ते 1414 या काळात राज्यकारभार केला किया सुधिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक व फिरोजशहा तुघलक हे तीन सुलतान या घराण्यांमध्ये प्रसिद्ध होऊन गेले तुगलक घराण्याचा संस्थापक असलेल्या गॅस उद्दीन नंतर सत्तेवर आलेल्या मोहम्मद बिन तुगलक यांची कारकीर्द विशेषतः त्याच्या धाडसी प्रयोगामुळे प्रसिद्ध आहे महसूल सुधारणा दुवाबातील कर पद्धत, आदर्श कृषी योजना, राजधानी बदलाचा प्रयोग, संकेतिक चलन पद्धती हे प्रयोग राबवण्यात मोहम्मद तुगलकाला अपयश आले त्यामुळे त्याला लहरी मोहम्मद तसेच परस्पर विरोधी गुणांचा पुतळा असे देखील म्हटलं गेलं पण तो वास्तव्यामध्ये आदर्शवादी होता त्याची नजर ही काळाच्या पुढे धावणारी होती हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मोहम्मद तुगलकाकडे व्यावहारिक दृष्टिकोन नसल्यामुळे त्याला आपल्या योजना कार्यक्षमतेने राबवता आल्या नाहीत

तुघलक राज्यकर्ते

  1. गयासुद्दीन तुघलक
  2. मुहम्मद बिन तुघलक
  3. फीरोजशाह तुघलक

तैमूरलंगच्या आक्रमणाने तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली.