तुकाराम जाधव (गिर्यारोहक)
तुकाराम जाधव हे एक मुंबईतील विले पार्ल्याच्या दीनानाथ नाट्य मंदिरात नाटकांचे फलक रंगवणारे एक कलावंत आहेत. ते इ.स. १९७८पासून हे काम करीत आहेत. याशिवाय जाधव हे गिऱ्यारोहकही आहेत. ३०० वर्षे मानवाचा स्पर्श झालेला लिंगाणा ते चढून गेले आहेत. दुर्गम भवानी कड्यावरचे आरोहण आणि पौर्णिमेच्या रात्री रायगडच्या हिरकणी कड्यावर केलेले आरोहण त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. यांव्यतिरिक्त त्यांनी आणखी ३५ दुर्गम कड्यांवर प्रस्तरारोहण केले आहे.
तुकाराम जाधव यांना २०१५ सालचा शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दिला गेला आहे.
तुकाराम जाधव यांनी दुर्गभ्रमणाच्या अनुभवांवर लिहिलेली व काही अनुषंगिक पुस्तके
- गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे
- शिवरायांचा आठवावा प्रताप
- श्रीमंत योगी
- स्वामी विवेकानंद (अप्रकाशित)
तुकाराम जाधव यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भवानीवीर म्हणून केलेला सन्मान.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हिरकणी वीर हा सन्मान.
- सतत चौदावेळा किल्ले रायगडाची प्रदक्षिणा केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नी. दांडेकर यांनी त्यांना रायगडभूषण हा विशेष किताब दिला.
- पार्ल्याच्या नागरिकांनी पार्लेभूषण म्हणून केलेला गौरव.
- पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' यांनी दिलेला श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार. (२०१५)