तुंबाडचे खोत (पुस्तक)
तुंबाडचे खोत ही श्री.ना. पेंडसे लिखित मराठी कादंबरी आहे. या द्विखंडी कादंबरीमध्ये कोकणातील तुंबाड गावातील काल्पनिक खोत परिवाराच्या सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात. या कादंबरीत तुंबाड आणि तुंबाडच्या परिसराचे वर्णन आढळून येते.