Jump to content

तुंगी बुद्रुक

  ?तुंगी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरऔसा
प्रांतमहाराष्ट्र
विभागऔरंगाबाद विभाग
जिल्हालातूर
तालुका/केऔसा
लोकसंख्या
• पुरूष
• स्त्री
५,२१०
• ८२.२ %
• ९४.६ %
भाषामराठी

तुंगी (बुद्रूक) ता. औसा जि. लातूर हे गाव औसा तालुक्याच्या दक्षिणेला वसलेले असून औसा तालुक्यापासून १३ कि.मी. अंतरावर आहे.गावाचे क्षेत्रफळ १५६३ हे. लागवडीखालील क्षेत्र : १३४७ हे. इतर क्षेत्र २१६ आहे.[]

लोकेशन

औस्यातुन निघाल्यानंतर अजीम कॉलेजच्या पुढे आल्यास एक फाटा फुटतो आणि वानवडा हे गाव लागते. पुढे नरसिंहाचे मंदिर लागते आणि तिथूनच तुंगी गावची सुरुवात होते.[]

गावची लोकसंख्या

............ वर्षीच्या जनगणेने नुसार गावची एकूण लोकसंख्या ५२१० यात स्त्री : २५६९ आणि पुरुष : २६४१ आहेत. स्त्री साक्षरता ९४.६% म्हणजे २४३२ स्त्रीया आणि पुरुष साक्षरता २१७२ ८२.२% एवढी आहे.[]

पवित्र स्थळे

गावामध्ये पंचमगीर महाराजाचा मठ आहे पंचमगीर महाराज हे संन्यासी होते. त्यांनी आध्यात्मिक आणि गरिबासाठी कार्य केले होते . मठातील 'काळी रोटी ' खूप प्रसिद्ध होती. महाराज प्रत्येक वर्षी गावासाठी 'काळ्या रोटीचे' गावजेवण देत असत आणि ती परंपरा आजही तशीच चालू आहे. गावाला सुसज्य प्रवेशद्वार आहे.[]

गावामध्ये पवनपुत्र हनुमान मंदिर , विराट हनुमान मंदिर, पुरातन हनुमान आणि महादेव मंदिर, मठ, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, करीम शहावली दर्गा, अरबीया मदरसा मज्जीद, समाज मंदिर इ. तिर्थस्थळे आहेत.[]

१९९३ च्या भूकंप

१९९३ च्या भूकंपात तुंगी गावची खूप मोठी हानी झाली होती, एकत्र गाव विखुरले गेले. नंतर शासनातर्फे ५२ गावच्या पुर्नवसनामध्ये तुंगी गावचे पुर्नवसन झाले. त्यामध्ये ५०० घरे बांधन्यात आली. प्रत्येकाला त्यांच्या शेतजामिनिनुसार घरे वाटप करण्यात आली.[]

आर्थिक आणि सामाजिक बाबीं

आर्थिक बाबींचा विचार केला तर गावामध्येच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आणि विशेष कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे. तसेच २५-३० बचत गट कार्यरत आहेत, विशेष म्हणजे काही बचत गट हे २७ वर्षापासून चालू आहेत.[]

तुंगी (बु.) २०११ मध्ये तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कृत झाले. आणि बक्षिस म्हणून ४ (चार ) लाख रु. मिळाले.श्रीमती सुभद्रा उघाडे यांनी..... कार्याने .....वर्षी राष्ट्रपती पुरस्कार/पदक प्राप्त केले आहे. श्री. वामन चव्हाण, तुंगी (बु.) हे आदर्श शेतकरी' हा सन्मानाने सन्मानीत शेतकरी आहेत.गावातील पहिलवान श्री. शिवशंकर भावले यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धात सहभाग नोंदवला आणि .......ठिकाणी ......वर्षी झालेल्या ....... स्पर्धेत सन्मान आणि पदके प्राप्त केली.[]

गावात जिजाऊ ज्ञानमंदिर प्रि प्रायमरी इंग्लिश स्कूल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महात्मा गांधी विद्यालय या शाळा आहेत.गावात नागरिकांना संगणक शिक्षण पुरवणारी खाजगी संस्था सुद्धा आहे.[]

प्रगती तंत्रज्ञान

तसेच ई-महासेवा केंद्र ही गावामध्येच आहे. तुंगी (बु.) गावाची वेबसाईट ०१-०१-२०१३ रोजी सुरू झाली.[]

ग्राम पंचायत समिती

तुंगी (बु.) ग्रामपंचायतीची स्थापना १९८२ साली झाली .ग्रामपंचयतीत ११ सर्कल आणि ४ वॉर्ड आहेत. सध्याचे सरपंच अनिल नारायण सगर आणि उप -सरपंच मुमताज निसार कारभारी आहेत. गावात तलाठी, ग्रामसेवक,कृषिसहायक, ग्राम रोजगार सेवक, तंटामुक्ती अध्यक्ष,केंद्रप्र प्रमूख 'प्राथमिक आरोग्य उपकेंद्र' इत्यादी शासकीय आधीकारी आहेत.[]

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h i j k तुंगीबीके.कॉम[permanent dead link],हे संकेतस्थळ दिनांक ११ जानेवरी २०१३, भाप्रवे रात्रौ २१.१४ वाजता जसे दिसले.