तीर्थंकर
जैन आपल्या धर्म प्रसारक करणाऱ्या सिद्ध पुरुषांना 'तीर्थंकर असे म्हणतात. तीर्थंकर म्हणजे मार्ग दाखविणारा, भवसागरातून तरून जाण्यास मदत करणारा होय. जैन दर्शनामध्ये तीर्थकरांची संख्या 24 सांगितली जाते. 'ऋषभदेव' हे पहिले तीर्थकर मानले जातात. ऋषभदेवांच्या कार्यकाळ निश्चित करणे कठिण आहे. असे मानने सुद्धा कठीण आहे की, सुरुवातीचे बाविस तीर्थंकर होऊन गेले किंवा नाही, परंतु यातील ऋषभदेव आदी काही पुरुष किंवा सर्वच तीर्थंकर इतिहासात असण्याची शक्यता आहे. तेविसावे तीर्थंकर ‘पार्श्वनाथ’ हे ऐतिहासिक पुरुष होते. त्यांचा कालावधी इ.स.पू. आठवे किंवा नववे शतक मानले जाते. शेवटचे चोविसावे तीर्थंकर यांच्या अस्तित्वाविषयी कसलीही शंका नाही. यांचा कालावधी
इ.स.पू. सहावे शतक मानले जाते. आणि हे गौतम बुद्धांच्या समकालीन होते. जैन धर्म बौद्ध धर्मापेक्षा अत्यंत प्राचीन आहे. जैन दर्शनांचे जे स्वरूप चालत आलेले आहे ते सांगण्याचे पूर्ण श्रेय शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर यांना जाते. यांनीच खऱ्या अर्थाने जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. जैन धर्माचे तत्वज्ञान निश्चित केले. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. वर्धमान महावीर क्षत्रिय कुळात जन्माला आले. वर्धमान महावीर यांना जैन धर्माचे संस्थापक मानले जाते.