तिसोक
तिसोक | ||
---|---|---|
तेनोच्तितलानचा त्लातोआनी | ||
[[Image:|240px|]] | ||
हस्तलिखित तेल्लेरियानो-रेमेन्सिस मध्ये दाखविलेला तिसोक | ||
अधिकारकाळ | १४८१-१४८६ | |
पदव्या | त्लाकतेक्कतल | |
मृत्यू | १४८६ | |
पूर्वाधिकारी | अशायाकात्ल | |
उत्तराधिकारी | अवित्झोतल | |
वडील | तेझोझोमोक | |
आई | हुइत्झहोचत्झिन |
तिसोकिक किंवा तिसोकिकात्सिन (त्याच्या नावाचे आदरार्थी रूप), (इंग्लिश/स्पॅनिश - तिझोक) हा तेनोच्तित्लानचा सातवा त्लातोआनी होता.
बऱ्याच स्त्रोतांनुसार तो १४८१ मध्ये (अॅझ्टेक वर्ष "२ घर") त्याच्या मोठा भाऊ अशायाकात्ल नंतर सत्तेवर आला. तथापि त्याचा अंमल फार कमी काळ होता. त्या काळातच त्याने तेनोच्तित्लानचा ग्रेट पिरॅमिडचे बांधकाम सुरू केले (हे काम नंतर त्याच्या लहान भावाने - अवित्झोतलने १४८७ मध्ये पुरे केले). त्यानेच तोलुका दरीतील मात्लात्झिन्कान लोकांचे बंड मोडून काढले.
हस्तलिखित मेंदोझातील संदर्भानुसार त्याने आपल्या कारकिर्दीत तोनालिमोक्युत्झायान, तोहिको, एकतेपेक, चिलान, तेकाहिक, तोलोकान, यान्क्युइत्लान, त्लाप्पान, अतेझ्काहुआकान, मझात्लान, होचियेत्ल, तामापाच्को, एकात्लिक्वापेचो, आणि मिक्युएत्लान ही अल्तेपेतले जिंकली.
तिसोकचा १४८६ मध्ये मृत्यू झाला, आणि तो कसा मेला हे काहीसं संदिग्ध आहे. काही स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला, तर काहीं स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे तो "चेटूक" किंवा आजाराने बळी पडला. असेही सांगितले जाते की त्लाकएलेलने किंवा इतर राजकूटूंबाच्या सदस्यांनी (विशेषतः अवित्झोतलने) विषप्रयोग केला असावा.
टिप्पणी
- ^ Based on the maps by Ross Hassig in "Aztec Warfare"
संदर्भ
- Townsend, Richard F. (2000) The Aztecs. revised ed. Thames and Hudson, New York.
- Hassig, Ross (1988) Aztec Warfare: Imperial Expansion and Political Control. University of Oklahoma Press, Norman.
- Weaver, Muriel Porter (1993). The Aztecs, Maya, and Their Predecessors: Archaeology of Mesoamerica (3rd ed. ed.). San Diego: Academic Press. ISBN 0012639990.CS1 maint: extra text (link)
हे सुद्धा पहा
तिसोकचा दगड
अॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची
मागील अशायाकात्ल | {{{title}}} १४८१–१४८६ | पुढील अवित्झोतल |