तिलोत्तमा
तिलोत्तमा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा तिळभर जास्त उत्तम म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.
सुंद आणि उपसुंद या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरून भांडत एकमेकांचा जीव घेतला. त्यावरून भारतीय भाषात दोघांमधील भांडणासाठी सुंदोपसुंदी असा शब्द आला.