Jump to content

तिरोल

तिरोल
Tirol
ऑस्ट्रियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

तिरोलचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
तिरोलचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देशऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानीइन्सब्रुक
क्षेत्रफळ१२,६४७.२ चौ. किमी (४,८८३.१ चौ. मैल)
लोकसंख्या७,१०,०००
घनता५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AT-7
संकेतस्थळwww.tirol.gv.at

तिरोल (जर्मन: Tirol) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या तिरोल राज्याचे उत्तर तिरोलपूर्व तिरोल हे एकमेकांपासून २० किमी अंतरावर असलेले दोन भाग आहेत. उत्तर तिरोलच्या पूर्वेस जाल्त्सबुर्ग व पश्चिमेस फोरार्लबर्ग ही राज्ये, उत्तरेस जर्मनीचे बायर्न हे राज्य, दक्षिणेस इटलीचा त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हा प्रदेश तर नैर्ऋत्येस स्वित्झर्लंडचे ग्राउब्युंडन हे राज्य आहे. पूर्व तिरोलच्या पूर्वेस क्यार्न्टन हे राज्य तर दक्षिणेस इटलीचा व्हेनेतो हा प्रदेश आहे.

इन्सब्रुक ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे