Jump to content

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे केरळमधील तिरुवनंतपुरमच्या तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. उत्तर रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम ते दिल्ली दरम्यानचे २,८४८ किमी अंतर पार करायला ४५ तास व ४० मिनिटे लागतात. राजधानी एक्सप्रेस शृंखलेमधील ही सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे. केरळ एक्सप्रेस ही तिरुवंतपुरम ते दिल्लीदरम्यान धावणारी दुसरी जलद गाडी आहे.

मंगळूर ते मुंबईदरम्यान ही गाडी कोकण रेल्वेमार्गावरून धावते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२४३१तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन१९:१५१६:५५मंगळ, गुरू, शुक्र
१२४३२हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम२३:४५०८:१५बुध, गुरू, रवि

मार्ग

स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
TVC तिरुवनंतपुरम
QLN कोल्लम६५
ALLP अलेप्पी १४९
ERS एर्नाकुलम२०६
TCR तृशुर२८०
SRR शोरणूर ३१३
CLT कोळिकोड३९९
CAN कण्णुर४८८
MAJN मंगळूर६२५
UD उडुपी७०६
KAWR कारवार९७३
MAO मडगांव १०५५
SWV सावंतवाडी रोड ११६५
RN रत्‍नागिरी१३९०
PNVL पनवेल१७५२
BSR वसई रोड १८१९
BRC वडोदरा २१६३
KOTA कोटा२६९१
NZM हजरत निजामुद्दीन३१४९

बाह्य दुवे