तिरडी
तिरडी म्हणजे मृतदेह नेण्यासाठी बांबूपासून बनविलेली वस्तू होय.
तिरडी बनविण्यासाठी मजबूत बांबूचे सहा फुटी दोन अखंड तुकडे व मधून चिरलेल्या बांबूचे १.५ ते दोन फुटी ८ ते दहा तुकडे लागतात. काथ्याच्या दोराने शिडीप्रमाणे ही रचना घट्ट बांधून तयार केली जाते. दोरा न तोडता अखंड वापरला जातो. मृतदेह ठेवण्यापूर्वी त्यावर गवत व नंतर कापड अंथरले जाते.
[ संदर्भ हवा ]