Jump to content

तिरंदाजी

तिरंदाजी चिन्ह
Archery in Bhutan


तिरंदाजी ही धनुष्याच्या साह्याने बाणाचे प्रक्षेपण करण्याची कला किंवा निपुणता आहे.इतिहासकाळात तिरंदाजी शिकार व युद्धात वापरली जात असे. आधुनिक युगात त्याचा वापर करमणुकीचा प्रकार म्हणून केला जातो.[]

तिरंदाजी जो करतो त्याला तिरंदाज म्हणले जाते.

इतिहास

तिरंदाजीचा शोध पॅलिओलिथिक काळखंडाच्या शेवटी किंवा मेसोलिथिक कालखंडाच्या सुरुवातीला लागला असावा. तिरंदाजी वापराचा युरोपातला सर्वात जुना निर्देश स्टेलमूर ह्या हॅमबर्ग जवळील जागी आढळतो व तो पॅलिओलिथिक कालखंडाच्या ओसरत्या काळातला ख्रिस्तपुर्व १०,००० ते ९,००० वर्षे जुना आहे. त्यावेळी बाणाचा मागचा भाग पाइन लाकडाचा व पुढचा ४ ते ६ इंच भाग टोकदार दगडाचा असे. त्याआधीचे धनुष्य सापडलेले नाही. त्याही अगोदरचे टोकदार स्तंभ आहेत पण ते बहुतेक भाला म्हणून वापरले गेले असावेत. आपल्याला माहित असलेले सर्वात आदि धनुष्य डेनमार्कमधल्या होमगार्ड ह्या दलदल भागात मिळालेले आहे. यथावकाश धनुष्य हे टोकदार स्तंभ फेकण्यासाठी त्याच्या पल्ल्यामुळे जास्त वापरले जाउ लागले. तरिही अमेरिकेच्या काही भागात विशेषतः मेक्सिकोत धनुष्यबरोबर भाले वापरणे चालू राहिले.

धनुष्य व बाण इजिप्त संस्कृतीत सापडतात. मधल्या काळातल्या एसिरी, फारसी, पार्थिय, भारतीय, कोरिया, चिनी, जपानी व तुर्की संस्कृतीत तिरंदाज सैन्यात मोठ्या संख्येने असत.

आशिया खंडात तिरंदाजीचा बराच विकास झाला होता. संस्कृतातील त्यासाठीचा शब्द धनुर्वेद हा सर्वसाधारण सेनानी खेळांच्या संदर्भात वापरला जात असे.

सवारी तिरंदाजी

मध्य आशियातल्या जमाती (घोड्याना पाळीव केल्यावर) व अमेरिकेतील मूळ जमाती (घोड्यांशी संबंध आल्यावर) सवारी तिरंदाजीत निपुण झाले. मध्य आशियातील डोंगर उतारांवर सवारी तिरंदाजी फार कामी येत असे. अशा तिरंदाजांच्या मोठ्या फौजांनी वारंवार युरेशियाच्या बऱ्याच प्रदेशांवर कब्जा केलेला आहे.

तिरंदाजीचा ह्रास

बंदुके आल्यावर त्यापुढे तिरंदाजी फिकी पडली. त्याकाळी तिरंदाजीला समाजात व युद्धात मान होता तरिही बंदुकीच्या लांब पल्ल्यामुळे प्रत्येक समाजाने तिरंदाजीला अवहेलून बंदूकीला स्विकारले. बंदुकी कशामागे हक्षलसपक्षृलपूनही डागता येतात. बंदुकी वापरायला फारसे शिकवावे लागत नाही. ह्या सर्वामुळे तिरंदाजीचा ह्रास झाला.

आयुधे

आधुनिक स्पर्धात्मक तिरंदाजी

स्पर्धात्मक तिरंदाजीत विशिष्ट अंतरावरील निषाणाला अचूक भेदायचे असते. जगभर लोकप्रिय झालेली ही स्पर्धात्मक तिरंदाजी निषाणी तिरंदाजी म्हणून ओळखली जाते.

संदर्भ यादी