तिमूरशाह दुराणी
तिमूरशाह दुराणी (पश्तो: تېمور شاه دراني ;) (इ.स. १७४८ - मे १८, इ.स. १७९३) हा ऑक्टोबर १६, इ.स. १७७२ ते इ.स. १७९३ साली मृत्यू पावेतो राज्यारूढ असलेला दुराणी साम्राज्याचा दुसरा अमीर होता. तो अहमदशाह दुराण्याचा थोरला पुत्र होता. अहमदशाहाच्या मृत्यूनंतर दुराणी साम्राज्याच्या गादीवर बसलेल्या तिमूरशाहास काही पठाण टोळीप्रमुखांचा विरोध होता. या राजकीय विरोधकांचा बिमोड करून दुराणी साम्राज्यावर पकड मिळवण्यातच त्याची बह्वंशी शक्ती व हयात खर्ची पडली. कंदाहारातील पठाण टोळ्यांचा या बंडाळ्यांत हात असल्यामुळे त्याने आपली राजधानी कंदाहारातून काबूल येथे हलवली.
इ.स. १७९३ साली तिमूरशाह मरण पावला. त्यानंतर झमनशाह दुराणी हा तिमूरशाहाचा पाचवा पुत्र साम्राज्याच्या तख्तावर बसला.
संकेतस्थळ
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - तिमूरशाहाबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)