Jump to content

तिबोटी खंड्या

तिबोटी खंड्या (इंग्लिश:Oriental Dwarf Kingfisher; शास्त्रीय नाव:Ceyx erithaca) हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होवून येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात.[]

माणगाव येथे भक्ष्य चोचीत पकडलेला खंड्या
रात्रीच्या वेळी

नर मादी एकमेकांना शिळ घालून साद देतात. जोडी जमल्यावर एखाद्या ओहळात किंवा ओहळाशेजारी मातीच्या कड्यात नर मादी बीळ करून घरटे करतात. अति मानवी हस्तक्षेपामुळे कर्नाळा अभयारण्यात या पक्ष्याच्या दर्शनाला बंदी घालावी लागली.[]

पाल, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी, बेडूक इत्यादी त्याचे आवडते खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्याबाहेर येतात तो पर्यंत त्यांची काळजी घेतली जाते.

संदर्भ

  1. ^ डुबे, लक्ष्मण (२८ ऑगस्ट २०१८). "तिबोटी खंड्या आता परतीच्या प्रवासाला". सकाळ ई-पेपर. 2019-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "कर्नाळ्यात 'तिबोटी खंड्या'चे आगमन; पक्षीप्रेमी-पर्यटकांना प्रवेश बंदी". www.mahamtb.com. 2021-06-04 रोजी पाहिले.