Jump to content

तिखोल

तिखोल हे पारनेर तालुक्यातले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक लहान गाव आहे. गावातील ९९ % लोक हे शेतकरी आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका हा थोडाफार तसा डोंगराळ असून दुष्काळी तालुका आहे.

तिखोल गावाच्या पूर्वेला धोत्रे व हिवरे कोरडा ही गावे, दक्षिणेला खानूर पठार व काकानेवादी ही गावे आणि पश्चिमेला टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे.तिखोळ हे पारनेरपासून १७ किमी अंतरावर असून कल्याण- विशाखापट्टण महामार्गापासून फक्त ४ किमी अंतरावर आहे. या गावाला गावापासून ५ कि.मी. अंतरावरच्या खानूर पठार या गावामार्गेपण जाता येते.

तिखोल गावात काळू नदी आहे. गावाला तीन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. तीन बाजूनी डोंगर आणि मध्ये खोल दरीत वसलेले गाव, यामुळेच या गावाला तिखोल हे नाव पडले. तिखोल गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग आहेत. गावाचा कारभार सरपंच पाहतात.

गावामध्ये भव्य दिव्य असे मुत्ताबाई मातेचे मंदिर आहे. खूप दूरवरून लोक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. याच गावामध्ये हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, खंडेश्वर, लाम्हणबाबा, हरिहरेश्वर यांचीही देवळे आहेत. गावातये सरकारी हॉस्पिटल, तालीम, वाचनालय इत्यादी सुखसुविधा आहेत. सर्व धर्माचे लोक गावामध्ये सुखासमाधानाने राहतात.हो