Jump to content

ताश्कंद करार

Declaración de Taskent (es); તાશ્કંદ સમજૂતી (gu); Ташкентская декларация (ru); Deklaration von Taschkent (de); Tashkent Declaration (en-gb); Տաշքենդի հռչակագիր (hy); 塔什干宣言 (zh); Taşkent Deklarasyonu (tr); タシュケント宣言 (ja); Tasjkentdeklarationen (sv); Ташкентська декларація (uk); 塔什幹宣言 (zh-hant); 塔什干宣言 (zh-cn); తాష్కెంట్ ప్రకటన (te); ਤਾਸ਼ਕੰਤ ਐਲਾਨਨਾਮਾ (pa); Tashkent Declaration (en-ca); Taškentská deklarace (cs); தாஷ்கந்து ஒப்பந்தம் (ta); dichiarazione di Tashkent (it); তাশখন্দ চুক্তি (bn); déclaration de Tachkent (fr); ताश्कंद करार (mr); Declaração de Tashkent (pt); ताशकन्द समझौता (hi); Deklaracio de Taŝkento (eo); Declarația de la Tașkent (ro); اعلامیہ تاشقند (ur); Toshkent uchrashuvi (uz); താഷ്കെന്റ് ഉടമ്പടി (ml); Daşkənd bəyanatı (az); Taškentin julistus (fi); تاشقند اعلامیہ (pnb); تاشقند اعلان (sd); Tasjkent-overeenkomst (nl); Tashkent Declaration (en); إعلان طشقند (ar); 塔什干宣言 (zh-hans); הצהרת טשקנט (he) zwischen Pakistan und Indien 1966 geschlossener Friedensvertrag, der den Zweiten Indisch-Pakistanischen Krieg (Zweiten Kaschmirkrieg) beendete (de); भारत और पाकिस्तान के बीच शांति समझौता (hi); traité de paix signé entre le Pakistan et l'Inde, qui met fin à la deuxième guerre indo-pakistanaise (fr); ભારત-પાકિસ્તાન વચ્ચેની શાંતિ સંધિ, ૧૯૬૬ (gu); fredsavtal från 1966 mellan Indien och Pakistan (sv); peace agreement between India and Pakistan (en-ca); peace agreement between India and Pakistan advocated by USSR (en); vredesverdrag tussen India en Pakistan dat op 10 januari 1966 werd gesloten en een formeel einde maakte aan de Tweede Kasjmiroorlog (nl); 1965 యుద్ధం తరువాత భారత పాకిస్తాన్‌ల మధ్య జరిగిన శాంతి ఒప్పందం (te); peace agreement between India and Pakistan advocated by USSR (en); ڀارت ۽ پاڪستان وچ ۾ امن معاھدو (sd); rauhansopimus Intian ja Pakistanin välillä 1966 (fi); peace agreement between India and Pakistan (en-gb); اتفاق سلام بين الهند وباكستان (ar); 印度-巴基斯坦条约 (zh); இந்திய-பாக்கித்தான் போரைத் தீர்க்க 10 ஜனவரி 1966 அன்று ஏற்பட்ட ஒப்பந்தம் (ta) Declaración de Tashkent (es); तासकन्द समझौता (hi); Vertrag von Taschkent (de); Tashkent Declaration (sv); Ташкентська декларація (1966) (uk); タシケント宣言 (ja)
ताश्कंद करार 
peace agreement between India and Pakistan advocated by USSR
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारpeace treaty
स्थान ताश्कंद, उझबेकिस्तान
Full work available at URL
तारीखजानेवारी १०, इ.स. १९६६
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी केला गेला. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.

सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन जिब्राल्टर या नावाने मोहीम काढून जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हणले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णित अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि चीनमध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी शामिल होते. करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.[]

या करारातील ठळक कलमे

  • (१) संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली. *
  • (२) २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले. यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत.
  • (३) एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.
  • (४) एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.
  • (५) एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे. *
  • (६) एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे. *
  • (७) युद्धकैद्यांची अदलाबदल करणे. *
  • (८) उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.
  • (९) अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "ताश्कंद करार". Loksatta. 2016-12-26. 2018-03-25 रोजी पाहिले.
  2. ^ [१]