तार्या हेलोनेन
ताऱ्या हेलोनेन (फिनिश: Tarja Halonen; २४ डिसेंबर १९४३, हेलसिंकी) ही फिनलंड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २००० ते मार्च २०१२ दरम्यान ह्या पदावर राहिलेली हेलोनेन ही फिनलंडची पहिलीच महिला राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यक्षपदावर निवडून येण्यापूर्वी हेलोनेन १९७९ ते २००० ह्या काळामध्ये फिनलंडच्या संसदेची सदस्य होती.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-12-30 at the Wayback Machine.
मागील मार्टी अह्तीसारी | फिनलंडची राष्ट्राध्यक्ष 2000–2012 | पुढील साउली नीनिस्टो |