तान्या बलसारा
तान्या बलसारा (?) या स्वतः अंध असून दृष्टीहीनांसाठी मुंबईमध्ये संगणक केंद्र चालवितात.त्यांचे वय सुमारे ३८ वर्षे आहे.त्यांच्या वडिलांचे नाव सॅम बलसारा आहे. ते जाहिरातविश्वात नावाजलेले असामी आहेत.
आधीचा जीवनकाल
लहानपणापासून 'रेटिनायटिस पिगमेंटोसा'[मराठी शब्द सुचवा] हा विकार झाल्यामुळे तिची दृष्टी हळूहळू अंधूक होत गेली व काही काळाने ती पूर्ण अंध झाली.तिने आपले शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण केले. तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पूर्ण केले. यात तिची बहिण व मैत्रीण यांनी तिला साथ दिली.
यानंतर तिने अंधांना शिकविणाऱ्या एका संस्थेत मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण केले.व नंतर 'तान्या कॉम्युटर सेंटर' उभारले. तिने यानंतर आपले अंधांना संगणक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. यात तिच्या कुटुंबियांनीही तिला बरीच मदत केली.