Jump to content

ताकिन

ताकिन
Takin

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी (Vertebra)
जात: सस्तन (Mammalia)
वर्ग: युग्मखुरी (Artiodactyla)
कुळ: गवयाद्य (Bovidae)
जातकुळी: काप्रिने (Caprinae)
जीव: ताकिन (Budorcas)
जाति (जीवविज्ञान)
  • Budorcas taxicolor bedfordi - सोनेरी ताकिन
  • Budorcas taxicolor taxicolor - मिश्मी ताकिन
  • Budorcas taxicolor tibetana - तिबेटी ताकिन
  • Budorcas taxicolor whitei - भूतान ताकिन


ताकिन हा एक सस्तन चतुष्पाद प्राणी आहे. हा भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच भूतान आणि तिबेट मध्ये आढळतो.

त्याचे डोके मोठे असते. त्याला लांब, कमानीयुक्त शिंगे असतात. शिंगे नर व मादी दोन्ही लिंगांमध्ये असतात. शिंगाची लांबी सुमारे ३० सेमी (१२ इंच) असते. परंतु ते ६४ सेमी (२५ इंच) पर्यंत वाढू शकतात. नर व मादीचे चेहरे रंगाने काळे असतात. ताकिनच्या अंगावर काळसर जाड लोकर असते. ताकिन हे तपकिरी-लालसर, तपकिरी -पिवळ्या, पिवळसर-तपकिरी रंगाचे आढळतात. त्यांना कमी जास्त केस असतात. केसांची लांबी ३ सेमी (१.२ इंच) पर्यंत असू शकते. हिवाळ्यात डोक्याच्या खाली २४ सेमी (९.४ इंच) पर्यंत वाढू शकते. मादी ताकिनचे वजन २५०-३०० किलो तर नर ताकिनचे वजन ३००-३५० किलो असते. ताकिन आपल्या संपूर्ण शरीरावर एक तेलकट आणि उग्र गंधयुक्त पदार्थ ठेवतो.

प्रजाती

ताकिनच्या चार प्रजाती ज्ञात आहेत:

चित्रदालन

गोल्डन ताकिन
भुतानी ताकिन
मिश्मी ताकिन


संदर्भ

  1. ^ Tashi Wangchuk (2007). "The Takin - Bhutan's National Animal". In Lindsay Brown; Stan Armington (eds.). Bhutan. Lonely Planet. p. 87. ISBN 978-1-74059-529-2. 15 September 2011 रोजी पाहिले.

संदर्भ

https://www.britannica.com/animal/takin