ताकवहाळ
?ताकवहाळ महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .१०६०७ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,६४६ (२०११) • १५,५१८/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५२५ • एमएच४८ |
बोलीभाषा:आदिवासी कातकरी |
ताकवहाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मनोर गावानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव वसलेले आहे. पालघरपासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३६ कुटुंबे राहतात. एकूण १६४६ लोकसंख्येपैकी ८६८ पुरुष तर ७७८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.०७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.७५ आहे तर स्त्री साक्षरता ५७.८२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २८६ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १७.३८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.मुंबई अहमदाबाद महामार्गाला जवळ असलेल्या ह्या गावात महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या माणसांवर तात्काळ उपचार करण्यासाठी एक अद्ययावत रुग्णालय बांधण्यात येत आहे.[१]
जवळपासची गावे
बांधण, लोवारे, काटाळे, वासरोळी, वाकडी, सावरखंड, कारळगाव, टेन, दुर्वेस, साये, तामसई ही जवळपासची गावे आहेत.हे गाव सावरखंड, टेण गावासह टेन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.
संदर्भ
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक १७ जून २०२३