तांबूस पोटाची मनोली (पक्षी)
तांबूस पोटाची मनोली (इंग्लिश:Jerdon's Rufousbellied Munia) हा एक पक्षी आहे.
आकाराने चिमणीपेक्षा लहान आहे.कपाळ,पंख,आणि शेपटीचा रंग गर्द चाॅकलेटी तपकिरी.पाठ तपकिरी व त्यावर पिवळसर रंगाच्या रेघा असतात.पार्श्व गर्द चाॅकलेटी तपकिरी आणि शेपटीवरील भाग तांबूस असतो.गाल,कंठ आणि छाती काळसर तपकिरी.इतर रंग गुलाबीसर तपकिरी.नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
निवासी.स्थानिक स्थलांतर करणारे.पूर्व घाटात विशाखापट्टणम जिल्हा,दक्षिण कर्नाटक,केरळ आणि पश्चिम तामिळनाडू.
एप्रिल ते ऑगस्ट या काळात वीण.
निवासस्थाने
झुडपी प्रदेश,कुरणे आणि जंगलातील पडीत शेतीचा प्रदेश.
=संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली