Jump to content

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[] इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.[]

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

इतिहास

१८८३ साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. तिच्या परिसरातील ही गणेश असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते.[] शारदीय नवरात्र उत्सवकाळात तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविक येतात. ही देवी आणि येथील गणपती ही दोन्ही दैवते भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.[]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!". लोकमत. 2019-08-28. 2021-09-08 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाच्या दुसऱ्या 'तांबडी जोगेश्वरी' गणपतीचे विसर्जन". दैनिक प्रभात. 2021-09-17 रोजी पाहिले.
  3. ^ "इतिहास पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पां". दैनिक प्रभात. 2022-09-02. 2022-09-03 रोजी पाहिले.
  4. ^ Gandhile, Dr Ganesh Dattoba (2023-08-01). “A GEOGRAPHICAL STUDY OF PILGRAMAGE TOURISM OF PUNE DISTRICT” (इंग्रजी भाषेत). Laxmi Book Publication. ISBN 978-1-312-34312-2.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती