तांबडा भट चंडोल (पक्षी)
तांबडा भट चंडोल (शास्त्रीय नाव:mirafra erythroptera; इंग्लिश:Redwinged Bush Lark/Indian Bush Lark; हिंदी:अगिया,झिरझिरा,जंगली अगिया) हा एक पक्षी आहे.
ओळखण
हा पक्षी आकाराने चिमणी एवढा हा पक्षी उडताना त्याच्या पंखावर दिसणाऱ्या तांबूस डागांवरून तांबडा भट चंडोल इतर चंडोलातून वेगळा ओळखला जातो.या पक्ष्याचे नर व मादी असे दोन प्रकार पडतात नर व मादी दिसायला सारखे असल्याने त्या दोघांला ओळखणे कठीणच जाते.हा पक्षी हवेत उडताना सि-सि-सि-सि न त्या पाठोपाठ लगेच व्हिसी-व्हिसी-व्हिसी असा आवाज करतो.
वितरण
अतीपावसाचा प्रदेश सोडून हे पक्षी सर्वत्र आढळून येतात.हे पक्षी जास्तीत-जास्त मार्च ते ऑक्टोबर या काळात दिसतात.
निवासस्थाने
हे पक्षी झुडपी जंगले व रानामध्ये राहतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली