Jump to content

तांदुळवाडी

तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?तांदुळवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरसफाळे
जिल्हापालघर
भाषामराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: [http://Tandulwadi

Maharashtra 401102

https://goo.gl/maps/rGBpBX7Ew3p Tandulwadi Maharashtra 401102

https://goo.gl/maps/rGBpBX7Ew3p]

भौगोलिक स्थान

हे गाव सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ किमी अंतरावर वसलेले आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि काही ठिकाणी तो साचून राहतो. उन्हाळ्यात येथील हवामान फारच उष्ण असते. हिवाळ्यात सकाळी भरपूर धुके पडलेले असते व हवामान अत्यंत आल्हाददायक शीतल असते.

लोकजीवन

येथे शेती करणारे कुणबी तसेच जंगलात काम करणारे आदिवासी समाजातील लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. गावात प्राथमिक शाळा आहे. जवळच असलेल्या डोंगरावर तांदुळवाडी किल्ला आहे.सार्वजनिक स्वच्छता, रस्तेवीज, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी ग्रामपंचायतीमार्फत पुरविल्या जातात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

जवळपासची ठिकाणे

तांदूळवाडी किल्लावैतरणा नदी, पारगाव पूल, तांदुळवाडी डोंगर, साईबाबा मंदिर

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc