तांदुळनेर
तांदुळनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या वायव्य दिशेला वसलेले छोटेसे गाव आहे..
गावाची लोकसंख्या अंदाजे ७०० च्या घरात आहे.
गावाच्या उत्तरेस खळखळून वाहणारा भंडारदारा धरणाचा उजवा कालवा,तर दक्षिणेस मल्लेश्वराचा भला उंच डोंगर आणि गावाच्या मध्य भागावर असलेली खंडोबाची टेकडी ही गावची आकर्षणे आहेत.
गावाच्या पूर्व दिशेस आणि पश्चिम दिशेस दोन वाहते ओढे आहेत.
तांदुळनेरचे ग्रामदैवत मानले जाणारे भैरवनाथ (बिरोबा) महाराज यांचे मंदिर गावामधे आहे.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे.