Jump to content

तस्कर

तस्कर (शास्त्रीय नावःElaphe helena)हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात.

वावर

हा साप मुख्यतः श्रीलंका आणि पश्चिम भारतात, दक्षिण भारतात आढळतो. हा साप महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आढळतो. छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत.

खाद्य

छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडूक इत्यादी

शत्रु

माणूस, मोठे शिकारी, पक्षी, मुंगूस, मोठे साप इत्यादी


वेटोळ्या घालून बसलेला तस्कर

संदर्भ

  • Book of Indian Reptiles- oxford press by BNHS