तवांग बौद्ध मठ
तवांग बौद्ध मठ (Tawang monastery) हा भारतातल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये असलेला एक मठ आहे.[१] हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ असून पोटाला पॅलेस (ल्हासा, तिबेट) या बौद्ध मठानंतरचा हा जगातील सर्वात मोठा मठ आहे. हा मठ हा तवांग नदीच्या खोऱ्यात, तवांग कसब्याजवळ आहे. हा मठ इ.स. १६८० दशकाच्या सुमारास मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी बनवला.[२] समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरील तवांग चू घाटामध्ये हा मठ स्थित आहे.
महत्त्व
या मठाला बौद्ध भिक्खू आंतरराष्ट्रीय ठेवा मानतात. बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र असल्याने या मठात जगभरातील बौद्ध भिक्खू आणि पर्यटक येतात.[३]
स्वरूप
तवांग बौद्ध मठ हा दुरून एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो. त्याच्या प्रवेशद्वाराचे नाव 'काकालिंग' आहे. हे दार डोंगरासारखे दिसते, त्याच्या दोन दगडी भिंतींवर चित्रे काढली आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
चित्रदालन
- प्रार्थना सभागृह
- मठाचे प्रवेशद्वार
संदर्भ
- ^ Kashyap, Tapati Baruah. At the Tawang Monastery (इंग्रजी भाषेत). Become Shakespeare. ISBN 978-93-5458-125-0.
- ^ Desk, Sentinel Digital (2022-02-14). "Tawang Tourism: Places, Best Time & Travel Guides - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-06 रोजी पाहिले.
- ^ "Arunachal Pradesh: The Crown Jewel of India : Part I". www.easternsentinel.in. 2022-06-06 रोजी पाहिले.