तळलेली कोंबडी
कोंबडीचे तळलेले पंख, पाय आणि मांडी | |
जेवणातील कोर्स | मुख्य जेवणापूर्वी दिला जाणारा खाद्यपदार्थ |
---|---|
अन्न वाढण्याचे तापमान | गरम किंवा थंड |
मुख्य घटक | कोंबडी आणि त्यावर लावलेले आवरण |
दक्षिणी तळलेली कोंबडी, ज्याला फक्त तळलेली कोंबडी म्हणूनही ओळखली जाते. यात कोंबडीचे तुकडे आवरण लावून तलात खोल तळतात किंवा पॅनमध्ये कमी तेलात तळतात किंवा उच्च दाब देउन तळतात. कोंबडीच्या बाह्य भागात ब्रेडक्रम्स लावल्याने कोंबडीच्या मांसांत रस टिकुन राहतो आणि आवरण मस्त कुरकुरीत होते. या पदार्थासाठी बहुधा ब्रॉयलर कोंबडीचा वापर केला जातो. गावठी कोंबडीत मांस कमी असल्याने तिचा वापर टाळतात.
पाश्चिमात्य इतिहासात खोल तळलेले पदार्थ म्हणून ओळखली जाणारी प्रथम अन्नपदार्थ म्हणजे फ्रिटर्स, हे युरोपियन मध्ययुगात लोकप्रिय होते. तथापि, युरोपियन लोकांमध्ये स्कॉटिश लोकांनी प्रथम कोंबडी तेलामध्ये तळली होती. त्यावेळेस त्यांनी तिला कुठलेही आवरण न लावता तळली होती. त्या दरम्यान, पश्चिम आफ्रिकन लोकांपैकी बऱ्याचजणांना तळलेली कोंबडी हा अन्नपदार्थ अवगत होता. आफ्रिकन लोक यासाठी पाल्म तेल वापरत असे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील गुलाम असलेल्या आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन लोकांद्वारे स्कॉटिश तळण्याचे तंत्र आणि पश्चिम आफ्रिकन आवरणाचे तंत्र एकत्र केले आणि हा नवीन अन्नपदार्थ बनवला.
इतिहास
ॲपिसियस यांचे रोमन कूकबुक (चौथे शतक) मध्ये पुलम फ्रंटोनियनम नावाने खोल-तळलेल्या कोंबडीची पाककृती आहे. [१]
अमेरिकन इतिहासात "तळलेली कोंबडी" (फ्राइड चिकन) प्रथम १८३० च्या दशकात दिसून येते. १८६० आणि १८७० च्या दशकाच्या अमेरिकन कूकबुकमध्ये याचे मोठ्या प्रमाणात संदर्भ सापडतात. [२] या पदार्थाची सुरुवात अमेरिकेतील दक्षिणेकडील भागात झाली आणि याचा उगम स्कॉटिश [३][४][५] आणि आफ्रिकेत [६][७][८][९] सापडतो. स्कॉटिश लोक कोंबडी चरबीमध्ये आवरण न लावता तळत होते [३][५] तर पश्चिम आफ्रिकन लोक आवरण लावून पाल्म तेलात कोंबडी तळत होते. [७][१०] अमेरिकन दक्षिण मध्ये आफ्रिकन गुलामांद्वारे स्कॉटिश तळण्याचे तंत्र आणि आफ्रिकन मसाला लावण्याचे तंत्र एकत्र वापरले गेले [३][४][५][९] तळलेल्या कोंबडीच्या या पदार्थाने गुलामगिरीत असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांसाठी स्व-कमाईचे साधन प्रदान केले. १७३० च्या दशकापर्यंत त्या जिवंत किंवा शिजवलेल्या कोंबडीच्या विक्रेत्या बनल्या. [११] यासाठी लागणारे साहित्य महाग असल्यामुळे, हा अन्नपदार्थ खास प्रसंगासाठी राखीव ठेवण्यात आला. [१०][८][९]
वर्णन
तळलेल्या कोंबडीचे वर्णन "रसाळ" [१२] आणि "कुरकुरीत" [१३] असे आहे. याव्यतिरिक्त, या पदार्थाला "मसालेदार" आणि "खारट" देखील म्हणले जाते. [१४] कधीकधी तळलेल्या कोंबडीला मसालेदार चव देण्यासाठी पपरीकासारखी मिरची किंवा हॉट सॉससह वाढली जाते. [१५] हे विशेषतः फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि केएफसीसारख्या साखळ्यांमध्ये दिसून येते. [१६] हा पदार्थ पारंपारिकपणे मॅश बटाटा, ग्रेव्ही, मॅकरोनी आणि चीज, कोलस्लॉ आणि बिस्किटसह दिले जाते. [१७]
विविध प्रकार
- बार्बर्टन कोंबडी, सर्बियन फ्राइड चिकन म्हणून ओळखले जाते, बार्बर्टन, ओहायो येथे सर्बियन स्थलांतरितांनी तयार केलेली आवृत्ती आहे जी संपूर्ण राज्यात लोकप्रिय झाली आहे. [१८]
- चिकन मेरीलॅंड हे पॅन-तळलेल्या कोंबडीचा एक प्रकार आहे. हे ताकात मिसळले जाते आणि मलई ग्रेव्हीसह (जी मेरीलॅंड राज्यात बनवली जाते). ही पाककृती युनायटेड स्टेट्सच्या पलीकडे ऑगस्टे एस्कोफीयरच्या हॉट व्यंजनापर्यंत पसरली आणि मोठ्या प्रमाणात बदल होऊन ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या खाद्यपदार्थांमध्ये सामील झाली. [१९] हा पदार्थ बनवला जाताना कोंबडीचे तुकडे आणि चरबी, पॅन फ्राईंगसाठी, ओव्हनमध्ये शिजवण्यासाठी ठेवली जाते, संपूर्ण पाककला ओव्हनमध्येच तळली जाते. [२०]
- पॉपकॉर्न चिकन, ज्याला चिकन बाईट्स म्हणूनही ओळखले जाते. यात हाड नसलेले कोंबडीचे लहान लहान तुकडे, पिठलेले घोळवून तळलेले असतात, परिणामी हे पॉपकॉर्नसारखे दिसणारे छोटे छोटे तुकडे असतात. [२१]
- चिकन आणि वॅफल्स हे मिश्रण पारंपारिकपणे न्याहारी आणि रात्रीच्या जेवणात खाल्ली जाते. [२२]
- गरम चिकन, हे मुख्यत्वे नॅशविले, टेनेसी भागात खाल्ले जाते. हा एक पॅनमध्ये तळलेला प्रकार आहे. यात स्वयंपाकात वापरण्याची डुकराची साल आणि लाल मिरची पेस्ट असते. [२३]
संदर्भ
- ^ Walter M. Hill, De Re Coquinaria of Apicius (1936), p. 153. Apparently the recipe was named after a certain Frontone who lived in the time of Septimius Severus (2nd century).
- ^ etymonline.com; The United States Cook Book: A Complete Manual for Ladies, Housekeepers and Cook (1865), p. 104. Marion Harland, Common Sense in the Household: A Manual of Practical Housewifery (1874), p. 90.
- ^ a b c Sumnu, Servet Gulum; Sahin, Serpil (December 17, 2008). Advances in Deep-Fat Frying of Foods (इंग्रजी भाषेत). CRC Press. pp. 1–2. ISBN 9781420055597.
The origin of fried chicken is the southern states of America. Fried chicken had been in the diet of Scottish people for a long time, but they did not use seasoning. After African slaves had been hired as cooks, they added seasoning to the fried chicken of the Scottish people. Because slaves were allowed to feed only chickens, fried chicken became the dish that they ate on special occasions. This tradition spread to all African-American communities after the abolition of slavery.
- ^ a b Mariani, John F. (1999). The Encyclopedia of American Food and Drink. New York: Lebhar-Friedman. pp. 305–306.
The Scottish, who enjoyed frying their chickens rather than boiling or baking them as the English did, may have brought the method with them when they settled the South. The efficient and simple cooking process was very well adapted to the plantation life of the southern African-American slaves, who were often allowed to raise their own chickens.
quoted at Lynne Olver. "history notes-meat". The Food Timeline. February 21, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 20, 2009 रोजी पाहिले.. - ^ a b c Robinson, Kat (Oct 21, 2014). Classic Eateries of the Arkansas Delta. The History Press.
Most settlers from Europe were accustomed to having their chicken roasted or stewed. The Scots are believed to have brought the idea of frying chicken in fat to the United States and eventually into the Arkansas Delta in the eighteenth and nineteenth centuries. Similarly, African slaves brought to the South were sometimes allowed to keep chickens, which didn't take up much space. They flour-breaded their pieces of plucked poultry, popped it with paprika and saturated it with spices before putting it into the grease.
- ^ Rice, Kym S.; Katz-Hyman, Martha B. (2010). World of a Slave: Encyclopedia of the Material Life of Slaves in the United States [2 volumes]: Encyclopedia of the Material Life of Slaves in the United States. ABC-CLIO. pp. 109–110. ISBN 978-0-313-34943-0.
Chickens also were considered to be a special dish in traditional West African cuisine. ... Chickens were... fried in palm oil. ... Pieces of chicken fried in oil sold on the street ... would all leave their mark on the developing cuisine of the early South.
- ^ a b Kein, Sybil (2000). Creole: The History and Legacy of Louisiana's Free People of Color. LSU Press. pp. 246–247. ISBN 978-0-8071-2601-1.
Creole fried chicken is another dish that follows the African technique: "the cook prepared the poultry by dipping it in a batter and deep fat frying it
- ^ a b Opie, Frederick Douglass (2013). Hog and Hominy: Soul Food from Africa to America. Columbia University Press. p. 18. ISBN 978-0-231-51797-3.
..the African-American preference for yams and sweet potatoes, pork, chicken, and fried foods also originated in certain West African culinary traditions
- ^ a b c Worral, Simon (December 21, 2014) "The Surprising Ways That Chickens Changed the World" Archived December 22, 2014, at the Wayback Machine.. National Geographic: "When slaves were brought here from West Africa, they came with a deep knowledge of the chicken, because in West Africa the chicken was a common farm animal and also a very sacred animal. The knowledge that African-Americans brought served them very well, because white plantation owners for the most part didn't care much about chicken. In colonial times there were so many other things to eat that chicken was not high on the list."
- ^ a b Opie, Frederick Douglass (2013). Hog and Hominy: Soul Food from Africa to America. Columbia University Press. p. 11. ISBN 978-0-231-51797-3.
West African women batter dipped and fried chicken" and "The African-American practice of eating chicken on special occasions is also a West Africanism that survived the slave trade. Among the Igbo, Hausa, and Mande, poultry was eaten on special occasions as part of religious ceremonies.
- ^ Rice, Kym S.; Katz-Hyman, Martha B. (December 13, 2010). World of a Slave: Encyclopedia of the Material Life of Slaves in the United States [2 volumes]: Encyclopedia of the Material Life of Slaves in the United States (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. p. 109. ISBN 9780313349430. May 3, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 6, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Southern Living's Best Fried Chicken Recipe". NYT Cooking. May 22, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 21, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Adobo-Fried Chicken Recipe". NYT Cooking. May 16, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 21, 2016 रोजी पाहिले.
- ^ Eats, Serious. "The Food Lab: The Best Southern Fried Chicken". www.seriouseats.com. May 31, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 4, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Spicy Fried Chicken With Honey and Pickles". Wall Street Journal. January 9, 2014. ISSN 0099-9660. June 16, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 21, 2016 रोजी पाहिले.
- ^ Waxman, Olivia B. "KFC Introduces Nashville Hot Chicken". TIME.com. May 20, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 21, 2016 रोजी पाहिले.
- ^ Bruno, Pat (January 3, 1986). "Fried chicken worth clucking about". Chicago Sun-Times साचा:Subscription required. October 8, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 4, 2016 रोजी पाहिले.
- ^ Edge, John T. (Mar 2003). "The Barberton Birds". Attaché. February 16, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Maryland chicken with banana fritters and cornbread". BBC Food. May 13, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 19, 2016 रोजी पाहिले.
- ^ Fried Chicken Recipes Archived October 23, 2011, at the Wayback Machine.. Southernfood.about.com (November 9, 2011). Retrieved on January 30, 2012.
- ^ "Recipe: Devin Alexander's KFC's Popcorn Chicken". ABC News. April 26, 2006. June 2, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 18, 2016 रोजी पाहिले.
- ^ Myers, Dan (October 27, 2015). "America's best chicken and waffles". Fox News (इंग्रजी भाषेत). June 9, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 19, 2016 रोजी पाहिले.
- ^ Waxman, Olivia B. "KFC Introduces Nashville Hot Chicken". TIME.com. May 20, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 19, 2016 रोजी पाहिले.