Jump to content

तलूला गॉर्ज

पूर्व अमेरिकेतली अतिशय नयनरम्य व अद्‌भुत घळ म्हणजे तल्लुला गॉर्ज (इं:Tallulah Gorge). (अन्य उच्चार तलूला. तल्लूला). घळ म्हणजे दोन्ही बाजूंनी उतरत्या नैसर्गिक दगडी भिंती असलेली आणि मधून पाण्याचा झरा वहात असलेली अरुंद फटवजा दरी. ही घळ दोन मैल लांब व हजार फूट खोल आहे. प्रस्तरारोहण, गिर्यारोहण, कयाकिंग, माऊंटन बायकिंग आदी सारे साहसी खेळ येथे खेळता येतातच, शिवाय येथील शांत सुंदर निसर्गात, समृद्ध जंगलात निव्वळ भटकंती किंवा आराम करून घ्यायला हे अतिशय योग्य ठिकाण आहे. ही घळ अमेरिकेतल्या जॉर्जिया प्रांतात आहे. या प्रांतातील सात नैसर्गिक नयनरम्य चमत्कारांमध्ये तल्लुला गॉर्जला गणले जाते.

तल्लुला नदीने ’तल्लुला .डोम’ या प्रस्तरखंडाला दुभंगून मार्ग काढल्याने ही घळ मिर्माण झाली आहे. तल्लुलाचा स्थानिक भाषेतला अर्थ आहे कोसळणारे पाणी. या खडकाळ टेकाडांवरून ६ नयनरम्य धबधबे खाली उड्या घेताना दिसतात. त्यांना तल्लुला धबधबे म्हणतात. त्यांतला हरिकेन हा सर्वात मोठा धबधबा ९६ फुटांवरून खाली कोसळतो. इथली जैवविविधता इतकी आहे की तिच्या व या खाईच्या रक्षणासाठी ’तल्लुला गॉर्ज स्टेट पार्क’ स्थापन करण्यात आले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच तल्लुला गॉर्ज हे अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ख्यातनाम झाले आहे. [ चित्र हवे ]