तलाश (२०१२ चित्रपट)
2012 film by Reema Kagti | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
Performer |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
मूल्य |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
तलाश: द आन्सर लाईज विदीन हा २०१२ चा भारतीय हिंदी -भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.[१] रीमा कागतीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला, झोया अख्तर यांनी सह-लेखन केलेला, आणि एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आणि आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत आमिर खान निर्मित, वितरीत आणि प्रस्तुतकर्ता म्हणून रिलायन्स एंटरटेनमेंटसह हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असून, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव आणि शेरनाज पटेल सहाय्यक भूमिकेत आहेत.[२]
जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गीतांसह चित्रपटाचे गाणे राम संपत यांनी संगीतबद्ध केले होते.[३] चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण मार्च-नोव्हेंबर २०११ दरम्यान प्रामुख्याने मुंबई, पाँडिचेरी आणि लंडन येथे झाले.[४] ३० नोव्हेंबर २०१२ रोजी रिलीज झालेल्या [५] तलश: द आन्सर लाईज विदिनला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यांनी तिच्या कथानक, दिग्दर्शन, पटकथा, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांच्या कामगिरीची प्रशंसा केली. त्याची जगभरातकमाई १७४.२१ कोटी (US$३८.६७ दशलक्ष) होती व २०१२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी हा एक बनला आहे.[६]
५८ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये, चित्रपटाला ३ नामांकने मिळाली: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (मुखर्जी), सर्वोत्कृष्ट गीतकार (अख्तर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिद्दीकी) यांचा समावेश आहे.
संदर्भ
- ^ "Aamir urges fan to keep Talaash plot secret". India Today. 6 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2012 रोजी पाहिले.
Talaash is a crime thriller and it is Aamir's first release after 3 Idiots, which released in 2009.
- ^ "Talaash: The Answer Lies Within (2012)". Bollywood Hungama. 30 November 2012. 7 January 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Electronic flavour rules 'Talaash' soundtrack : Bollywood, News". India Today. 2012-11-05. 7 March 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-11-27 रोजी पाहिले.
- ^ "Aamir & Rani snapped on the sets of Reema Kagti's movie". Pinkvilla. 10 March 2011. 28 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Talaash: The Answer Lies Within: Release Date". One India Entertainment. 16 July 2012. 26 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Top Ten Worldwide Grossers 2012". Box Office India. 17 January 2013. 2 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2013 रोजी पाहिले.