तर्कसूची
तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. हे अनुमानांचे विविध प्रकार आणि त्यांच्या युक्ततेचे नियम यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. द्रव्य आणि आकार या कल्पना भौतिक पदार्थांना लागू होतात.त्याच कल्पना तर्कशास्त्रज्ञांनी अनुमानाला सुद्धा लागू केलेल्या आहेत. ज्या प्रमाणे प्रत्येक भौतिक पदार्थाला स्वतःचे एक द्रव्य आणि आकार असतात, त्याप्रमाणे अनुमानांना सुद्धा द्रव्य आणि आकार असतात. अनुमानाचे विविध प्रकार असू शकतात. तर्काशास्त्राज्ञ अशा सामान्य आकारांचा अभ्यास करीत असतात. अनुमानाचे कोणते आकार युक्त आहेत आणि कोणते आकार अयुक्त आहेत हे ठरविणे तर्कशास्त्राचे कार्य आहे. म्हणजेच अनुमानाच्या युक्तायुक्ततेचे नियम तर्कशास्त्र ठरविते. विशिष्ट स्वरूपाच्या अनुमानांपेक्षा त्यांच्या सामान्य आकारांशी तर्कशास्त्र संबंधित असल्यामुळे तर्कशास्त्राला आकारिक शास्त्र असे म्हणले जाते. तर्कशास्त्राचा संबंध अनुमानाच्या आशयाशी नसून आकाराशी आहे. आशयरहित अनुमानाकाराचा अभ्यास करावयाचे झाल्यास अनुमानाकार व त्याचे घटक असलेले विधानाकार यांकरिता कांही संकेतांचा (प्रतीकांचा/चिन्हांचा) उपयोग करावा लागतो. तर्कशास्त्रामध्ये सर्वमान्य असलेल्या संकेतांची सूची खालील तक्त्यात दिलेली आहेत, त्यांचा तर्कशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त ठरेल.