तर्कशास्त्र
तर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र होय[१]. अनुमान ही विचारांची एक पद्धती आहे. ह्या विचारपद्धतीत चिकित्सापूर्वक निष्कर्षाप्रत येणे अभिप्रेत असते. अनुमानांचे प्रकार, त्यांचे स्वरूप, कोणती अनुमाने प्रमाण ठरतात, प्रमाण ठरण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता व्हावी लागते इत्यादी प्रश्नांचा विचार तर्कशास्त्रात होत असतो.
संज्ञा आणि व्युत्पत्ती
तर्कशास्त्र ही मराठी संज्ञा म्हणजे तर्क आणि शास्त्र ह्या दोन शब्दांनी साधलेला सामासिक शब्द आहे. ह्यांपैकी तर्क ही संज्ञा मराठीत अटकळ बांधणे किंवा लक्षणदर्शनावरून झालेलें एखाद्या पदार्थाचें, गोष्टीचें ज्ञान, कल्पना[२] ह्या अर्थांनी रूढ आहे.
तर्कशास्त्राचे लक्षण/ व्याख्या
अनुमानाची व युक्तिवादाची युक्तता ज्यावर आधारित असते अशा तत्त्वांचा शोध घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणारे व त्यामुळे अनुमितीचे व युक्तिवादाचे प्रामाण्य ठरविण्यास उपयोगी पडणारे शास्त्र ते तर्कशास्त्र होय[३]
संदर्भसूची
संदर्भसूची
- दाते, य. रा.; कर्वे, चिं. ग. (eds.). तर्क. महाराष्ट्र-शब्दकोश : डिजिटल डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया. शिकागो विद्यापीठ. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
- दीक्षित, श्रीनिवास हरी. तर्कशास्त्र. अजब पुस्तकालय, कोल्हापूर.
- रेगे, मे. पुं. तर्कशास्त्र. मराठी विश्वकोश. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
- हेमाडे, श्रीनिवास. तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र. लोकसत्ता. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.