Jump to content

तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस

तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

१२६५१/१२६५२ तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जाणारी व संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तमिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानक ते दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ह्या स्थानकांदरम्यान धावते. आठवड्यातून दोनदा धावणारी व मर्यादित थांबे असलेली तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस मदुराई व दिल्लीदरम्यानचे २,६७६ किमी अंतर सुमारे ४२ तासांमध्ये पूर्ण करते. ही गाडी तिरुचिरापल्ली, चेन्नई, विजयवाडा, नागपूर, भोपाळ ह्या मोठ्या शहरांमधून जाते.

थांबे

स्थानक कोड नाव अंतर (किमी)
MDU मदुराई 0
DG दिंडिगुल 66
TPJ तिरुचिरापल्ली 161
ALU अरियालूर231
VRI विरुधाचलम284
VM विलुप्पुरम 338
CGL चेंगलपट्टू441
TBM तांबरम472
MS चेन्नई इग्मोर497
BZA विजयवाडा 931
NGP नागपूर 1593
BPL भोपाळ 1982
JHS झाशी 2273
NZM हजरत निजामुद्दीन2676