Jump to content

तमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०१६

तमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०१६
भारत
२०११ ←
१६ मे २०१६→ २०२१

तमिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ जागा
बहुमतासाठी ११८ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता जयललिताएम. करुणानिधी
पक्ष अण्णा द्रमुकद्रमुक
मागील निवडणूक १५० २३
जागांवर विजय १३६ ९८
बदल १४ ६६
मतांची टक्केवारी ४१% ४०%

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

जयललिता
अण्णा द्रमुक

मुख्यमंत्री

जयललिता
अण्णा द्रमुक

तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या तमिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १६ मे २०१६ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू विधानसभेमधील सर्व २३४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाने १३६ जागांसह बहुमत मिळवून सत्ता राखली. दर पाच वर्षांनी सत्तांतरण होणाऱ्या तमिळनाडूमध्ये सत्ताधारी राजकीय पक्षाने बहुमत राखल्याची १९८४ नंतर ही पहिलीच वेळ होती. द्रमुक पक्षाने मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले परंतु बहुमत मिळवण्यात द्रमुकला अपयश आले.

अम्मा जयललिता ह्यांनी लढवलेली ही अखेरची निवडणूक होती. डिसेंबर २०१६ मध्ये आजारपणामुळे जयललिता ह्यांचे निधन झाले व ओ. पन्नीरसेल्वम तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.

बाह्य दुवे