तमिळनाडू एक्सप्रेस
तमिळनाडू एक्सप्रेस | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
माहिती | |||||||
सेवा प्रकार | मेल-एक्सप्रेस (अति-जलद) | ||||||
प्रदेश | भारत - नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू | ||||||
शेवटची धाव | अद्याप सुरू | ||||||
चालक कंपनी | दक्षिण रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग | ||||||
मार्ग | |||||||
सुरुवात | नवी दिल्ली | ||||||
थांबे | ९ | ||||||
शेवट | चेन्नई | ||||||
अप क्रमांक | १२६२२ | ||||||
निघायची वेळ (नवी दिल्ली) | २२:३० | ||||||
पोचायची वेळ (चेन्नई) | ०७:३० (तिसऱ्या दिवशी) | ||||||
डाउन क्रमांक | १२६२१ | ||||||
निघायची वेळ (चेन्नई) | २२:०० | ||||||
पोचायची वेळ (नवी दिल्ली) | ०७:०० (तिसऱ्या दिवशी) | ||||||
अंतर | २,१८४ किमी | ||||||
साधारण प्रवासवेळ | ३३ तास ३० मिनिट | ||||||
वारंवारिता | रोज | ||||||
प्रवासीसेवा | |||||||
प्रवासवर्ग | वातानुकुलित शयनयान (दुसरा व तिसरा वर्ग), २ | ||||||
अपंगांसाठीची सोय | नाही | ||||||
झोपण्याची सोय | ६ शायिकांचा कंपार्टमेंट, ८ शायिकांचा कंपार्टमेंट | ||||||
खानपान | पॅंट्री कार, फेरीवाले कंत्राटी विक्रेते | ||||||
सामान ठेवण्याची सोय | प्रवासी कंपार्टमेंटमध्येच | ||||||
तांत्रिक माहिती | |||||||
डबे, इंजिने, इ. | २ एस.एल.आर डबे | ||||||
गेज | ब्रॉडगेज | ||||||
|
तमिळनाडू एक्सप्रेस ही भारताच्या नवी दिल्ली आणि चेन्नई शहरांच्या मध्ये धावणारी अतिजलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी ऑगस्ट ७, इ.स. १९७६ रोजी सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हस्ते उद्घाटन झालेली ही गाडी सुरुवातीस आठवड्यात दोन वेळा धावत असे. ही सप्ताहात तीन वेळा धावत होती. सन १९८२ मध्ये एशियन खेळ झाले तोपर्यंत ती त्याच वेळा देत होती. जून १९८८ मध्ये माधवराव शिंदिया यांनी या ट्रेनला ग्वालियर थांबा देऊन तिची दैनदिन सेवा चालू केली. भारतीय रेल्वेच्या संचातील ही अतिवेगवाण ट्रेन आहे.या गाडीचा क्रमांक १२६२१/१२६२२ आहे.
इतिहास
ही ट्रेन चालू झाली तेव्हा तिचे १३ डबे होते आणि क्रमांक १२१/१२२ होते. ती WDM-2 या इंजीनचे मदतीने चालवली जात होती. सन १९८० चे शेवटी शेवटी या रेल्वे मार्गाच्या कांही भागाचे विद्युतीकरण झाल्यानंतर WDM 2 आणि WDM 4 या इंजीनच्या मदतीने धाऊ लागली आणि या मार्गावर विजयवाडा आणि इटारसी या दोन ठिकाणी इंजिन बदलण्याची व्यवस्था केली.
या ट्रेनचे नाव तामिळनाडू एक्सप्रेस असले तरी तिच्या प्रस्थानाच्या ठिकाणाशिवाय राज्यात एकही थांबा नाही.[१]
मार्ग
ही ट्रेन विजयवाडा,वरंगल,बल्लारशः,नागपूर, इतराशी जंक्शन, भोपाल जंक्शन,झांसी जंक्शन, ग्वालियर, आग्रा कन्ट्टोंमेंट, आणि हजरत निजामूद्दीन मार्गे न्यू दिल्लीत पोहचते.[२]
तिला विजयवाडा आणि चेन्नई या मध्ये थांबा नाही. चेन्नई ते विजयवाडा हे अंतर ती ६ तास २० मिनिटात कापते आणि तोच उलट प्रवास ती ६ तास ४५ मिनिटात कापते. तिरुवंथपुरम राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, कोचूवेली देहरादून सुपर फास्ट एक्सप्रेस, कोचूवेली अमृतसर सुपर फास्ट एक्सप्रेस, केरळा संपर्क क्रांति एक्सप्रेस या ट्रेन (विना थांबा कोटा आणि वडोदरा दरम्यान ५२८ किमीअंतर) धावतात यांच्या नंतरची दोन क्रमांकाची ४३१ किमीविना थांबा धावनारी ही ट्रेन आहे.
बोगी
या ट्रेनला खूप मागणी आहे त्यामुळे २४ बोगीची व्यवस्था आहे. त्यात ६ वातानुकूलित (AC) बोगी, १३ श्ययन यान बोगी, एक खान पान व्यवस्था बोगी, २ विना आरक्षित सामान्य द्वितीय वर्ग बोगी,आणि २ SLR's. आहेत.
इंजिन
इरोड येथील WDM 4 या इंजिनचा सामान्यतः वापर केला जातो.
अपघात
ही ट्रेन अति वेगवान असल्याने तिचे बरेच अपघात झालेले आहेत.
- ३१ ऑगस्ट १९८१ रोजी या ट्रेनचे १४ डबे घसरल्याने १५ प्रवाशी ठार झाले होते आणि ३९ जखमी झाले होते. या ट्रेनचे अपघाताची मालिका खालील प्रमाणे आहे.[३]
- जुलै ३०, २०१२ - नवी दिल्लीपासून चेन्नईकडे जाणाऱ्या गाडीस नेल्लोर येथे एस-११ डब्यास आग, ३२ ठार.[४]
वर्ष | ठिकाण | अपघाताचे कारण | जखमी /मृत्यू |
---|---|---|---|
१९७७ | विजयवाडा | घसरली | नाही |
१९७८ | नागपूर इटारसी सेक्शन | घसरली | नाही |
१९८१ | आसिफबाद रोड स्टेशन | घसरली | १५ ठार / ३९ जखमी |
१९८३ | काजीपेट | घसरली | नाही |
१९८४ | विजयवाडा | घसरली | नाही |
१९८४ | दिल्ली | एका बोगीला आग | २ बोगींचा कांही भाग खराब |
१९८६ | आगरा ग्वालियर स्टेशन | १ वर्ग बोगीला आग | ३ जखमी |
१९८७ | अमला नागपूर | १३ डबे घसरले | २ ठार/ ३० जखमी |
१९९० | मथुरा | रिकाम्या ट्रेनला टक्कर | नाही |
२०१२ | नेल्लोर | S11 बोगीत आग | ३२ ठार / २७ जखमी |
संदर्भ
- ^ "भारतातील क्लासिक रेलवे गाड्या - तामिळनाडू एक्सप्रेस".
- ^ "तामिळनाडू एक्सप्रेसची सेवा". 2016-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-08 रोजी पाहिले.
- ^ "तामिळनाडू एक्स्प्रेस दुर्देवी आहे का?".
- ^ "तामिळनाडू एक्स्प्रेसचा अपघात होऊन नेल्लोर जवळ ३२ प्रवासी जळले".