तमिळ चलचित्रपट
तमिळ सिनेमा किंवा कॉलीवुड (तमिळ: தமிழகத் திரைப்படத்துறை) ही भारताच्या चेन्नई शहरामधील एक मोठी चित्रपट सृष्टी व आशिया खंडातील प्रमुख चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. कॉलीवूड नाव तमिळ भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते. चेन्नई येथील कोडमबक्कम (कोडमपक्कम्) ह्या उपनगरात ही प्रामुख्याने वसलेली असल्याकारणाने तीस कॉलीवूड असे म्हणण्यात येते. ह्याच उपनगरात चित्रपटाशी संबंधीत अनेक प्रयोगशाळा,चित्रपट निर्माणस्थळ, चित्रपट निर्माता, कार्यशाळा, दिग्दर्शक व इतर कलाकार मंडळी वास्तव्यास आहेत.
थोडक्यात माहिती
तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा चित्रपट उद्योग असल्या कारणाने (संख्येनुसार/व्यापकतेनुसार) हे चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते. तसेच येथे श्रीलंकन सिनेमा व श्रीलंकन तमिळ सिनेमा देखील निर्मित केले जातात. आज तमिळ सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो श्रीलंका, सिंगापुर, दक्षिण कोरिया, मलेशिया, मॉरिशस, जपान, दक्षिण अफ्रिका, उत्तर अमेरिका, कॅनडा आणि पश्विम युरोपचे काही देश हे त्यापैकी काही राष्ट्र आहेत. भारतात देखील चेन्नई व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तमिळ सिनेमा पहावयास मिळतो. तमिळ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगीत, संस्कृती दर्शन व कला दिग्दर्शन आणि बिग बजेट (अधिक खर्चाचे) चित्रपट. चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे. तमिळ चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले असून महान संगीतकार ईळैयराजा व ए.आर.रहमान तसेच दिग्दर्शक मणीरत्नम, सुपरस्टार रजनीकांत,कमल हासन, शिवाजी गणेशन,एम.जी.आर., जोसेफ विजय ही त्यापैकी काही नाव.आज तमिळनाडूतील २८०० हुन अधिक चित्रपट गृहातुन कॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात.
संबंधीत दुवे
- तमिळ चित्रपट अभिनेते
- तमिळ चित्रपट अभिनेत्री
- सुपरहिट तमिळ फिल्म्स
हे सुद्धा पहा
- टॉलीवुड
- बॉलीवुड
- हॉलिवूड
- मॉलीवुड