Jump to content

तन्मणी

तन्मणी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते.[] हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना. मधे जे पदक असतं त्याला म्हणजे तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.[]

संदर्भ

  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ "या श्रावणातल्या सणांसाठी प्रत्येकीकडे असायलाच हवेत हे मराठी दागिने." Bobhata (इंग्रजी भाषेत). 2016-09-08. 2018-03-18 रोजी पाहिले.