Jump to content

तथापि ट्रस्ट


तथापि ट्रस्ट ही सामाजिक संस्था असून महिला आणि आरोग्य संसाधन विकास क्षेत्रात काम करते. राज्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील संस्था आणि संघटननांसोबत कामं केलं जातं. ’तथापि’चा अर्थ अनेक भारतीय भाषांमध्ये ’तरीही’, ’असे असूनसुद्धा’, ’यद्यपि’ असा होतो. आजुबाजूच्या सातत्यानं बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत आव्हानंही खूप आहेत. त्यांना सामोरं जात असताना अनेक अडचणी आल्या ’तरीही’ काम करण्याची गरज आहे म्हणून तथापि हे नाव संस्थेनं निवडलं आहे.

ध्येय

तथापि महाराष्ट्रभर तळागाळात काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्तींपर्यंत पोहचली आहे. तथापिच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षा व गरजांना आवाज मिळावा असा प्रयत्न आहे. राज्यभरातील स्थानिक कार्यकर्त्यांना आपलं वाटावं असं संसाधन केंद्र विकसित केलं आहे.

हे सुद्धा पहा