Jump to content

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची उपशाखा आहे[], ही तत्त्वज्ञानाची शाखा नाही. 'तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र' ही तुलनेने नवी संज्ञा आहे.'ज्ञानाचे समाजशास्त्र' आणि 'विज्ञानाचे समाजशास्त्र' या संज्ञांच्या धर्तीवर ही नवी संज्ञा तयार करण्यात आली आहे. कोणत्या सामाजिक परिस्थितीत तात्त्विक विचार निर्माण होतात, त्या परिस्थितींचा अभ्यास या शाखेत केला जातो.

हेतू

'तत्त्वज्ञानाचा समाजातील प्रभाव समजून घेणे' हा या विद्याशाखेचा मुख्य हेतू आहे. तत्त्वज्ञानाच्या समाजावर वेगवेगळा परिणाम होत असतो. त्या परिणामांमध्ये आणि त्या काळातील वेगवेगळ्या बौद्धिक कृतींमध्ये गुंतलेल्या सामाजिक परिस्थिती समजावून घेणे; समाजात विविध स्तरावर घडणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक संशोधनांच्या प्रक्रिया समजून घेणे आणि त्या प्रक्रियांच्या सामाजिक संरचनांचा व आकृतिबंधांचाही शोध घेणे, असे विविध हेतू या ज्ञानशाखेमागे आहेत.[]

संदर्भ

  1. ^ a b Heidegren, Carl-Göran; Lundberg, Henrik (2010). Towards a Sociology of Philosophy. Acta Sociologica, Vol. 53, No. 1. pp. 3–18. ISBN doi:10.1177/0001699309357831 Check |isbn= value: invalid character (सहाय्य).CS1 maint: multiple names: authors list (link)