तत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक)
तत्त्वज्ञान मंदिर (मराठी त्रैमासिक) हे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र या तत्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या अभ्यासकेंद्राचे प्रकाशन आहे. या त्रैमासिकाचा पहिला अंक जुलै-सप्टेंबर १९१९ या काळाचा आहे.[१]
"तत्त्वज्ञान मंदिर" या त्रैमासिकासोबत "फिलॉसॉफीकल क्वार्टरली" हे इंग्लिश त्रैमासिकही या संस्थेतून दीर्घकाळ प्रसिद्ध होत होत होती. पुणे विद्यापीठाने कार्यभार स्वीकारल्यानंतर ही प्रकाशने पुणे विद्यापीठाशी जोडली गेली. पुणे विद्यापीठाशी जोडले गेल्यावर "तत्त्वज्ञान मंदिर" हे परामर्श या नावाने प्रसिद्ध झाले तर "फिलॉसॉफीकल क्वार्टरली" हे "इंडियन फिलॉसॉफीकल क्वार्टरली" या नावाने प्रसिद्ध झाले. आता, जून १९९३ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या केंद्राचा स्वीकार केल्यानंतर ही प्रकाशने पुन्हा पूर्वीच्याच नावाने प्रसिद्ध होत आहेत.[२]
ध्येय विधान
या त्रैमासिकाचे ध्येयविधान 'इशोपनिषद' या उपनिषदातून स्वीकारले गेले आहे. तो इशोपनिषदातील पंधरावा मंत्र आहे.
- हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
- तत्त्वं पूषन्न अपावृणु सत्य-धर्माय दृष्टये।।
याचा अर्थ होतो :
- "सत्याचे मुख (ब्रह्सत्याचे मुख ) सुवर्णपात्राने झाकलेले आहे (आम्ही त्या सोन्यालाच भुलतो, पण...), पण त्या सोन्यामागे सत्य आवृत्त आहे.. म्हणून प्रार्थना करतो की, " हे महामाये, या सुवर्ण पात्रास दूर कर ज्यामुळे मी सत्याचे दर्शन करू शकेन ! "[३]
याचा संक्षिप्त भावार्थ अर्थ असा की, "ज्याला सत्य प्राप्ती करावयाची असेल त्याने सत्य शोधण्याचे श्रम केले पाहिजेत!"
पूषन याचा अर्थ पोषण करणारे तत्त्व. म्हणून पोषण करणारा परमेश्वर, सूर्य किंवा जगत अथवा माया अशी विविध भाषांतरे वापरली जातात. एका हिंदी अनुवादात " ‘हे परमात्मन् ! " [४]म्हंटलेले आहे, दुसऱ्या हिंदी अनुवादात "जगत्पोषक सूर्य !" [५] म्हंटलेले आहे तर तिसऱ्यात "हे महामाये" [६] म्हंटलेले आहे.
सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचे भाषांतर
सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी या मंत्राचे केलेले भाषांतर असे :
"सूर्यरूपी भांड्याचे मुख तेजाने झाकलेले आहे, हे सूर्या, मला आत्मज्ञान होण्यासाठी तू ते दूर कर." [७]
हरिकृष्णदास गोयन्दका यांनी केलेले हिंदी भाषांतर
पूषन् = हे सबका भरण-पोषण करनेवाले परमेश्वर; सत्यस्य= सत्यस्वरूप आप सर्वेश्वरका; मुखम्=श्रीमुख; हिरण्मयेन=ज्योतिर्मय सूर्यमण्डलरूप; पात्रेण=पात्रसे; अपिहितम्=ढका हुआ है; सत्यधर्माय=आपकी भक्तिरूप सत्यधर्मका अनुष्ठान करनेवाले मुझको; दृष्टये=अपने दर्शन करानेके लिये; तत्=उस आवरणको; त्वम्=आप; अपावृणु=हटा लीजिये.
व्याख्या : भक्त इस प्रकार प्रार्थना करे कि ' हे भगवन् ! आपकी भक्ति ही सत्यधर्म है और मैं उसमे लगा हुआ हूॅं; अतएव मेरी पुष्टि—मेरे मनोरथकी पूर्ति तो आप अवश्यही करेंगे. आपका दिव्य श्रीमुख—सच्चिदानन्दस्वरूप प्रकाशमय सूर्यमण्डलकी चमचमाती हुई ज्योतिर्मयी यवनिकासे आवृत्त है. मैं आपका निरावरण—प्रत्यक्ष दर्शन करना चाहता हूॅं, अतएव आपके पास पहुॅंचकर आपका निरावरण –दर्शन करनेमे बाधा देनेवाले जितने भी जो भी आवरण—प्रतिबन्धक हों, उन सबको मेरे लिये हटा लीजिये! अपने सच्चिनन्दस्वरूपको प्रत्यक्ष प्रकट कीजिये'[८]
मराठी भाषांतर
भक्ताने अशा प्रकारे प्रार्थना करावी की 'हे परमेश्वरा ! तुझी भक्ति हा सत्यधर्म आहे आणि मी त्यात डुंबलो आहे. म्हणून माझे सारे मनोरथ--माझ्या इच्छा तर तू पूर्ण करशीलच. तुझे दिव्य श्रीमुख – तुझे सच्चिदानंद स्वरूप प्रकाशमय सूर्यमंडळाच्या चमचमत्या किरणांनी आवृत्त झालेले आहे. मी तुझे अनावृत्त – प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छितो; म्हणून तुझ्याजवळ पोहोचून तुझे असे अनावृत्त दर्शन करण्यात बाधा आणणारे जितकी आवरणे असतील, बंधने असतील; ती सारी माझ्यासाठी तू दूर कर! आपले सच्चिदानंद स्वरूप तू प्रकट कर!'[९]
हेही वाचा
संदर्भ
- ^ संपादकीय, पान ५, तत्त्वज्ञान मंदिर, १९९७ खंड २ : अंक ३ व ४, संपादक : डॉ. अर्चना प्र. देगावंकर, प्रकाशक : डॉ. के. बी. पाटील, कुलसचिव,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,; मुद्रक : ईगल ऑफसेट
- ^ तत्त्वज्ञान मंदिर, १९९७ खंड २ : अंक ३ व ४, संपादक : डॉ. अर्चना प्र. देगावंकर, प्रकाशक : डॉ. के. बी. पाटील, कुलसचिव,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,; मुद्रक : ईगल ऑफसेट
- ^ स्वामी अभयानंद सरस्वती, https://www.facebook.com/swamiabhayanandsaraswatiji/posts/374813416040235
- ^ Sep 1967 अखण्ड ज्योति, http://literature.awgp.org/akhandjyoti/edition/1967/Sep/3
- ^ Indian Intellectual Stage, http://rudrajnu.blogspot.in/2011/02/eshavasyopnishad.html
- ^ स्वामी अभयानंद सरस्वती, https://www.facebook.com/swamiabhayanandsaraswatiji/posts/374813416040235
- ^ म. म. विद्यानिधी डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर (खंड १), भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४, प्रकाशिका : शैलजा विनायक चित्राव, कार्यवाह : भारतीय चरित्रकोश मंडळ, १२००६, अ/४५, जाणली महाराज रोड, पुणे ४, आवृत्ती दुसरी-सप्टेंबर २०१० किंमत रु. २००/-, मुद्रक : स्वानंद ट्रेडर्स १२०४/२४, डेक्कन जिमखाना, पुरंदरे लेन, पुणे ४, पान १४, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ग्रंथालय ग्रंथ क्र.21256368, Q1-24/चित्राव/56368
- ^ हरिकृष्णदास गोयन्दका, ईशादि नौ उपनिषद्, (व्याख्याकार : हरिकृष्णदास गोयन्दका), उनतीसवॉं पुनर्मुद्रण, मूल्य ५०/- रु. प्रकाशक:गीताप्रेस, गोरखपूर २७३००५ ISBN 81-293-0308-6, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ग्रंथालय, ग्रंथ क्र 21253608, Q1-24/ गोयन्दका /53608
- ^ श्रीनिवास हेमाडेकृत