तगर (फूल)
तगर | ||||||
---|---|---|---|---|---|---|
तगर | ||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
| ||||||
शास्त्रीय नाव | ||||||
Tabernaemontana divericata |
तगर हे एक भारत व बांगलादेशात मिळणारे फुलझाड आहे. हे फुलाचा पांढरा रंग असतो. या फुलाचे झाड एक झुडूप असते. या फुलाचे रोप आयुर्वेदिक असते. हे खरूज सारख्या रोगांना उपयोगी पडत. तगरचे शास्त्रीय नाव Tabernaemontana divericata ( टैबरनीमोटाना डाईवेरीकेटा ) असे आहे . या वनस्पतीला इस्ट इंडियन रोजबे (East Indian Rosebay) असे इंग्रजीत नाव आहे . या सदाहरित फुलझाडाची उंची जास्तीत जास्त ७ ते ८ फुटांपर्यंत असू शकते. पावसाळा आणि थंडीच्या दिवसात फुलांचा विशेष बहर येत असला तरी वर्षभर फुले येतात.
तगरीचे फूल आकाराने लहान, पाच पाकळ्या; त्यांचा रंग पांढरा शुभ्र, फुलाच्या देठाचा रंग हिरवागार. पाकळ्या पाणीदार आणि नाजूक असतात. त्यांची रचना साधारण चांदणीसारखी दिसते. त्यामुळेच त्याला चांदणी असेही म्हणतात. फुले सुगंधरहित असून फांद्यांच्या टोकावर येतात. या फुलांचा वापर देवपूजेसाठी तर केला जातोच, परंतु यापासून अनेक विकारांवर औषधेदेखील बनविली जातात. नेत्रविकार तसेच पडून किंवा खरचटून झालेली जखम भरून काढण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. तगरीच्या कळ्यांना बाजारात विशेष मागणी आहे. या काळ्यांचा वापर गजरे, हार, वेण्या बनविण्यासाठी केला जातो. विविध रंगांच्या लोकरीमध्ये विणलेल्या या पांढऱ्याशुभ्र कळ्यांची वेणी आपले लक्ष आपसूकच वेधून घेते.