तंतुमेघ
इंग्रजी नाव - Cirrus Cloud
संक्षिप्त खूण (Symbol) - Ci
मेघतळ पातळी | उच्च ५००० ते १४००० मीटर |
---|---|
आढळ | जगभर सर्वत्र |
काळ | संपूर्ण वर्षभर |
तंतुमेघ हे अत्युच्च पातळीवर आढळणारे पांढरे शुभ्र किंवा हलक्या राखाडी रंगाचे ढग असून संपूर्णपणे हिमकणांचे बनलेले असतात.[१] सूर्य क्षितिजावर असताना मात्र ह्या ढगांचा रंग पिवळा, तांबडा किंवा क्वचित राखाडी दिसू शकतो. त्यांचा आकार नाजूक व चमकदार तंतूंसारखा किंवा कुरळ्या केसांप्रमाणे असतो. काही वेळा ह्या ढगातून सूर्याभोवती वर्तुळ करणारे २२° खळे [ २२° Halo] दिसू शकतात .
असे ढग स्थिर असल्यास किंवा मंदगतीने हालचाल करत असल्यास ते प्रसन्न किंवा चांगल्या हवेचे लक्षण असते. मात्र जोरदार वाऱ्याबरोबर त्यांचीही शीघ्रगतीने हालचाल होत असल्यास हवेत बिघाड होणार असल्याचे ते निदर्शक असते.[२]
संदर्भ
- ^ DK Earth Definitive visual Guide. sept 2013. p. 481. ISBN 978-1-4093-3285-5.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ [मराठी विश्वकोश "मेघ* - उच्च पातळीवरील मेघ"] Check
|दुवा=
value (सहाय्य).