तंजावूर
?तंजावूर / தஞ்சாவூர் तमिळनाडू • भारत | |
टोपणनाव: तंजावर | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | ३६ चौ. किमी • ५४.२५ मी |
जिल्हा | तंजावर |
लोकसंख्या • घनता | २,१५,७२५ (2001) • ७,७००/किमी२ |
महापौर | तेनमोळि जयबालन |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ६१३ ००१ पासून ०१० • +त्रुटि: "९१-४३६२" अयोग्य अंक आहे • टी.एन.-४९ |
संकेतस्थळ: municipality.tn.gov.in/thanjavur |
तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे 1878 ते 1932 हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. पण भारतातील सर्वात भव्यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे (तमिळ:तंजावूर ; तमिळ: தஞ்சாவூர் रोमनलिपी:Thanjavur/Tanjore)हे भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे.
इतिहास
चोळ साम्राज्य
चोळ राजांनंतर
चोळांनी स्थापन केलेले तंजावर राज्य पुढे पांड्य, दिल्ली सुलतान, विजयनगर, मदुराई नायक आणि तंजावर नायक यांच्या अंमलाखाली आले. तंजावर नायक राजा विजयराघव याचा खून झाल्यावर त्याच्या मुलाने आपले राज्य परत मिळविण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे मदत मागितली. त्या काळात शहाजी राजे भोसले यांचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी आदिलशाहकडे नोकरीस होता. आदिलशाहने व्यंकोजीला सैन्य देऊन तंजावर नायकाला राज्य परत घेण्यास मदत करण्यासाठी पाठविले. परंतु व्यंकोजीने तंजावर येथे जाऊन तंजावर आपल्याच ताब्यात घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
भोसल्यांचे राज्य
व्यंकोजी उर्फ एकोजी भोसलेची राजकीय कारकीर्द इ.स. १६७४ ते १६८४ अशी झाली. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. व्यंकोजीनंतर तंजावर गादीवर अनुक्रमे पहिले शाहूजी, पहिले सरफोजी, तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळाजी यांची कारकीर्द झाली.
तुळाजीच्या कारकिर्दीत कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर आक्रमण करून कबजा केला. त्यावर तुळाजीने ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेऊन नवाबाकडून आपले राज्य परत मिळवले. पुढे गादीवर आलेल्या दुसऱ्या सरफोजीने ब्रिटिशांची मदत घेऊन आपल्या चुलत्यापासून संरक्षण मिळविले.
संस्थान खालसा
ब्रिटिशांनी १७९९ साली तंजावर संस्थान खालसा करून मद्रास प्रेसिडेन्सीत सामील करून घेतले. १७९९ ते १८३२ या काळात हे दुसरे सरफोजी राजे नामधारी राजा बनून राहिले. परंतु सरफोजींच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथ संग्रहालयामुळे ते आजही सन्मानपात्र आहेत. ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक मराठी, संस्कृत आणि अन्यभाषांतली दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत.
प्रेक्षणीय ठिकाणे
प्रसिद्ध व्यक्ती
पहा : मराठी संस्थाने
बाह्य दुवे
- तंजावर जिल्हा संकेतस्थळ Archived 2013-08-04 at the Wayback Machine.
- विज्ञान विद्यापीठ Archived 2017-10-31 at the Wayback Machine.
- ए.व्ही.व्ही.एम. श्री पुष्पम स्वायत्त महाविद्यालय