ढोक (घर)
ढोक हे भारत, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशात, हिमालयीन पर्वतश्रेणीत वावरणाऱ्या बखरवाल (मेंढपाळ) व तत्सम भटक्या जमातींद्वारे बांधण्यात येणारे घर आहे. या घराचे बांधकाम चिखल वापरून करण्यात येते. कुडाच्या भिंती असलेल्या घराशी याचे साधर्म्य असते.