ढवळेश्वर
ढवळेश्वर पुरंदर तालुक्यातील दिवेघाटापासून पूर्वेला भुलेश्वर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांंगेतील किल्लेवजा टेकडी आहे. आंबळे गावाच्या हद्दीत ढवळेश्वर शिवमंदिर आहे. आंबळे गावाला जुना इतिहास असून पेशव्यांना कर्जपुरवठा करणा-या खंडेराव दरेकर यांचे हे गाव. गावात त्यांचा जुना वाडा आहे.