डोके
मानवी शरीराचा वरचा व पुढील भाग. या भागात मेंदू, डोळे, नाक, कान आणि तोंड असते.
डोक्याचे रोग
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात . बद्धकोष्ठ, पोटात गॅस होणे , उच्च रक्तदाब असणे, नजर कमजोर होणे , जागरण , अति परिश्रम , अशक्तता , इत्यादी . साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजे .
- एका बाताश्यावर ४ थेंब अमृतधारा टाकून खावे . २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे .
- लीबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
- चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
- तिळाचे तेल २५० मिली , चंदनाचे तेल १० मिली , दालचिनीचे तेल १० मिली , आणि कपूर या सर्वांनी मिसळून बाटलीत भरून ठेवावे . हे तेल डोक्यास लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.
- दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे , वरून एक पेला कोमट दुध प्यावे.
- रोज सकाळी रिकाम्यापोटीएक साफरचंद कापून मीठ लावून चून खाल्याने जुनी डोकेदुखी दूर होते . हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.
मेंदूची ताकद वाढवा
- १ किलो गाजर किसून चार किलो दुधात उकळावे त्यात २५० ग्रॅम शुद्ध तूपात दहा बदाम टाकून भाजावे आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज ५० ग्रॅम खाऊन वरून दुध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस टाकत येते.
- एक सफरचंद आगीत भाजून पाणाच्या कळशीत सोडावे हे पाणी गळून प्यावे.
- धने, खसखस समप्रमाणात गेऊन कुटून घ्यावेत बारीक चूर्ण करावे. तेवढयाचा प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता कोमात दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपुर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
चक्कर येणे
- कोरडा आवळा सहा ग्रॅम, धने सहा ग्रॅम घेऊन त्यांचे कूट करावा. रात्री मातीच्या भांड्यात पाव लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी मळून व गाळून दोन चमचे वाटलेली खडीसाखर मिसळून प्यायल्याने चक्कर येणे थांबते.
- पोटाच्य गडबडीमुळे जर चक्कर येत असेल तर आर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने आराम वाटतो.
- २५ ग्रॅम मनुका शुद्ध तुपात परतून साडे मिठ टाकून खाल्याने चक्कर येणे थांबते.
- उन्हाळ्यात चक्कर येत असेल तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.
अर्धशिशी
- डोक्यात ज्या भागात दुखत असेल; त्या बाजुच्या नाकपुडीत ६-७ थेंब सरसोचे तेल टाकल्याने अथवा हुंगल्याने लगेच आराम पडतो.
- शुद्ध तुपाचे २-४ थेंब नाकात सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो . हा उपाय किमान एक आठवडा करणे जरुरीचे आहे.
- लसून वाटून दुखण्याच्या भागावर मळल्याने डोकेदुखी लगेच थांबते . हा प्रयोग बरयाच वेळा करावा लागू शकतो.
फिट्स
स्नायू संबंधी विकारांमध्ये फिट्स सर्वात भयानक रोग आहे. याचा दौरा कधीही कोठेही पडू शकतो. म्हणून अशा रोग्यानी तलाव, नदी, रेल्वेरूळ, किवा रस्तांवरून एकटे फिरु नये; किवा कुठलेही वाहन चालवू नये.
- तीन ग्रॅम कांद्याचा रस थोडेसे पाणी मिसळून सकाळच्या वेळी प्यायल्याने रोगात फायदा होतो. हा उपाय किमान सव्वा महिन्यापर्यंत करणे आवश्यक आहे. फिट आलेल्या माणसाच्या नाकपुडीत कांद्याचा रस लावल्याने त्याला शुद्धी येते.
- लसून वाटून नाकाला लावल्यास फिट्सच्या रोग दूर होतो.
- करवंदाची २५-३० पाने नाकात दोन आठवडे रोज सेवन केल्याने फिट्स येणे बंद पडते. रोग्यास एक पाव दुधात पाव कप मेहंदीचा रस मिसळून पाजल्याने फायदा होतो.
- मोहरी वाटून हुंगवल्याने रोग्यास शुद्धी येते.
- मुठभर तुळशीच्या पानांत ४-५ कपूरच्य वड्या मिसळून रोग्यास हुंगवायला लावावे.
संदर्भ
- ^ पुस्तक-रामबाण उपाय.