डॉनल्ड सदरलँड
डॉनल्ड मॅकनिकोल सदरलँड (१७ जुलै, १९३५:सेंट जॉन, न्यू ब्रन्सविक, कॅनडा - २० जून, २०२४) हा केनेडियन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेता आहे. याने द डर्टी डझन (१९६७), केलीझ हीरोझ, डोन्ट लूक नाऊ, द ईगल हॅझ लँडेड, आय ऑफ द नीडल सह अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. सदरलँडने जेएफके, आउटब्रेक, अ टाइम टू किल, स्पेस काउबॉइझ, द हंगर गेम्स यांसारख्या इतर अनेक चित्रपटांतून सहायक भूमिका केल्या. सदरलँडची अभिनय कारकीर्द ६० पेक्षा अधिक वर्षांची आहे.
याची तीन मुले कीफर सदरलँड, रॉसिफ सदरलँड आणि अँगस सदरलँड चित्रपट अभिनेते आहेत.