Jump to content

डॉक्टर स्ट्रेंज

डॉक्टर स्ट्रेंजच्या वेशभूषेत एक कलाकार


डॉक्टर स्टीफन स्ट्रेंज हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारे एक पात्र आहे. स्टीव्ह डिटको यांनी तयार केलेले हे पात्र प्रथम स्ट्रेंज टेल्स #११० मध्ये दिसले (जुलै १९६३). डॉक्टर स्ट्रेंज हा सर्वोच्च जादूगार (इंग्रजी: Sorcerer Supreme) म्हणून काम करतो. ही पदवी धारण करणाऱ्या व्यक्तीचे काम हे जादुई आणि गूढ धोक्यांपासून पृथ्वीचे प्राथमिक संरक्षक म्हणून असते. मार्वल कॉमिक्समध्ये वेगळ्या प्रकारचे पात्र आणि गूढवाद आणण्यासाठी कॉमिक पुस्तकांच्या सिल्व्हर एजमध्ये स्ट्रेंजची ओळख करून दिली.

कार अपघातात जखमी झालेल्या एका हुशार पण अहंकारी न्यूरोसर्जनच्या रूपात या पात्राची सुरुवात होते. अपघातामुळे त्याच्या हाताला मज्जातंतूचे गंभीर नुकसान झाल्यामुळे, त्याला सांगण्यात येते की सर्जन म्हणून पुन्हा काम करण्यास त्याचे सद्य वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन पुरेसे नाहीत. हे स्वीकारण्यास तयार नसल्याने तो उपचाराच्या पर्यायी मार्गांचा शोध घेत जगभर प्रवास करतो. तो एनशंट वन या सर्वोच्च जादूगाराकडे पोहोचतो. स्ट्रेंज त्याचा विद्यार्थी बनून गूढ आणि मार्शल आर्ट्स या दोन्हीमध्ये प्रवीण होतो. तो अ‍ॅगमोटोचा शक्तिशाली डोळा आणि लेविटेशनचा क्लोक यांसारख्या रहस्यमय वस्तू प्राप्त करतो. पुढे १७७ए ब्लीकर स्ट्रीट, ग्रीनविच व्हिलेज, मॅनहॅटन, न्यू यॉर्क सिटी येथील सॅन्क्टम सॅन्क्टोरम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेलीत तो वास्तव्य करतो. स्ट्रेंज सर्वोच्च जादूगार ही पदवी धारण करतो आणि वॉलेट वोंग सोबत गूढ धोक्यांपासून जगाचा बचाव करतो.

थेट-अ‍ॅक्शन रूपांतरांमध्ये हे पात्र पहिल्यांदा पीटर हूटेन यांनी १९७८ चा दूरदर्शन चित्रपट डॉ. स्ट्रेंजमध्ये साकारले होते. २०१६ पासून बेनेडिक्ट कंबरबॅचने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये स्टीफन स्ट्रेंजची भूमिका साकारली आहे.

संदर्भ