डॉ. बी.आर. आंबेडकर पुतळा, हैदराबाद
१२५ फुटांचा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा पुतळा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उभारण्यात आला आहे.[१] या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे, जो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[२][३]
२०१७ मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ व्या आंबेडकर जयंतीदिनी झाले.
११.४ एकर जागेवर हे स्मारक निर्माण केले गेले आहे, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत. संपूर्ण स्मारकासाठी खर्च सुमारे १४६.५ कोटी रुपये लागला.
हे सुद्धा पहा
- स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, विजयवाडा
- समतेचा पुतळा, मुंबई
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ^ Nanisetti, Serish (2023-01-28). "125-foot Ambedkar statue to be ready for opening in Hyderabad by April 14" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "In Photos: Construction of 125 Foot Ambedkar Statue in Full Swing in Hyderabad". The Wire. 2023-04-05 रोजी पाहिले.
- ^ "125 Feet Tall BR Ambedkar Statue Unveiled By KCR In Hyderabad". NDTV.com. 2023-04-14 रोजी पाहिले.