डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन
नवी दिल्लीतील भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तैलचित्र आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.[१][२] चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.[१][२] डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र संंसदेस भेट दिले होते.[१][२] या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.[१][३] या तैलचित्राचे अनावरण होत असताना दक्षिण आफ्रिकेचे नेता नेल्सन मंडेला म्हणाले होते की, आम्ही डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.[४]
भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व खासदार बी.सी. कांबळे यांनी केली होती. संसदेसोबतच राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयातही बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.[५]
डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान होते तर पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.[६] आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी बऱ्याच काळापासून जनता आंबेडकरी समाजाकडून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.[७]
चित्रदालन
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद
संदर्भ
- ^ a b c d "Lok Sabha". 164.100.47.194. 2020-07-14 रोजी पाहिले.
- ^ a b c "Rajya Sabha". rajyasabha.nic.in. 2020-07-14 रोजी पाहिले.
- ^ "List of Portraits Installed in Central Hall of Parliament House". Jagranjosh.com. 2019-06-20. 2020-07-14 रोजी पाहिले.
- ^ अटलबिहारी, वाजपेयी (१ जानेवारी २०१२). "डॉ. आंबेडकर : मानवता के ध्वजवाहक". मनोगत: ५.
- ^ मानकर, मिलिंद (एप्रिल २०१५). "बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा". लोकराज्य. अंक १०वा: १९.
- ^ देवी, Vasanthi Devi वासंती (2019-02-11). "जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2020-07-14 रोजी पाहिले.
- ^ देवी, Vasanthi Devi वासंती (2019-02-11). "जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2020-07-14 रोजी पाहिले.